pat cummins statement saam tv
क्रीडा

KKR vs SRH, IPL 2024 Final: दारुण पराभवानंतर पॅट कमिन्स भावुक! सामन्यानंतर सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Pat Cummins Statement: आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

सनरायझर्स हैदराबाद संघाने संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी केली. मात्र या संघाला फायनलमध्ये चॅम्पियनसारखा खेळ करता आला नाही. अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २० षटकअखेर ११३ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना कोलताना नाईट रायडर्स संघाने ८ गडी राखून आव्हान पूर्ण करत तिसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला. या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात जल्लोषाचं वातावरण होतं. तर दुसरीकडे पॅट कमिन्स निराश असल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यानंतर बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की, ' विरोधी संघातील गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. त्यांनी आम्हाला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. या खेळपट्टीवर २०० धावा होणं शक्य नव्हतं. मात्र १६० धावा केल्या असत्या, तर आमच्यासाठी संधी होती. आम्ही फलंदाजी करताना ३ वेळेस २५० पेक्षा अधिक धावा केल्या. हे हंगाम आमच्यासाठी शानदार होतं. '

या स्पर्धेत सुनील नरेनची प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवड करण्यात आली. तर अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या मिचेल स्टार्कची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. नितीश रेड्डीला एमर्जिंग प्लेअर ऑफ द सिजन, विराट कोहलीला ऑरेंज कॅप तर हर्षल पटेलला पर्पल कॅप देण्यात आली. दरम्यान या हंगामात सर्वोत्कष्ट झेलचा पुरस्कार रमनदीप सिंगला देण्यात आला.

संपूर्ण हंगामात आपल्या विस्फोटक फलंदाजीने गोलंदाजांचा घाम काढणारे हैदराबादचे फलंदाज निर्णायक सामन्यात फ्लॉप ठरले. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने यापूर्वी अनेकदा संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र फायनलमध्ये अभिषेक शर्मा अवघ्या २ धावा करत माघारी परतला. तर ट्रेविस हेडला खातंही उघडता आलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT