Summer Vacation In Satara : मनाला भुरळ घालणारे साताऱ्यातील हिल स्टेशन, कडाक्याच्या उन्हात 'येथे' मिळेल थंडगार हवा

Shreya Maskar

वाढता उन्हाळा

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. ज्यामुळे सर्वत्र गर्मी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी ट्रिप प्लान करतात. महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन विषयी आज जाणून घेऊयात.

Summer | yandex

सातारा

पाचगणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. जे महाबळेश्वरपासून फक्त २० किमी आणि पुण्यापासून सुमारे १००-११० किमी अंतरावर आहे. तुम्ही येथे वीकेंड ट्रिप प्लान करू शकता.

Satara Tourism | google

टेकड्यांचे स्वर्ग

पाचगणी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध थंड हवेचे असून ते 'पाच टेकड्यांची भूमी' म्हणून ओळखले जाते.

Panchgani | yandex

निसर्ग सौंदर्य

पाचगणीला गेल्यावर पठारी प्रदेश, सुखद थंड हवामान स्ट्रॉबेरीची शेती, कृष्णा नदी , पश्चिम घाट आणि दऱ्यांच्या दृश्य पाहायला मिळतात. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट करू शकता.

Panchgani | yandex

प्रमुख आकर्षणे

पाचगणीला टेबल लँड, पारसी पॉईंट, धोम धरण, सिडनी पॉईंट, धोम धरण, मॅप्रो गार्डनर आणि केट्स पॉईंट ही ठिकाणे प्रमुख आकर्षणे आहेत.

dam | yandex

सातारा पर्यटन स्थळे

साताऱ्यात कास पठार, ठोसेघर धबधबा, वजराई धबधबा, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगड, मयनी पक्षी अभयारण्य अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.

Kaas Plateau | yandex

कसं जावे?

तुम्ही मुंबईहून पाचगणीने बाय रोड, ट्रेन आणि बसने जाऊ शकता. ट्रेनने जाणार असाल तर सातारा किंवा पुणे स्टेशनला उतरून तुम्हीला पुढे टॅक्सीने पाचगणीला जाता येते.

Panchgani | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Panchgani | yandex

NEXT : आताच ठरवा! वीकेंडला करा पुण्याची सफर; 'येथे' बोटिंग, कॅम्पिंग अन् ट्रेकिंगचा घ्या आनंद

Pune Tourism | saam tv
येथे क्लिक करा...