KKR vs SRH, IPL Final 2024: KKR च्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष! खेळाडूंच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल

KKR Celebration After IPL 2024 Final: कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. दरम्यान या विजयानंतर खेळाडूंनी जोरदार जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले आहे.
KKR vs SRH, IPL Final 2024: KKR च्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष! खेळाडूंच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल
kolkata knight riders grand celebration after win over srh in ipl 2024 final amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी आशा होती. मात्र कोलकाताने हैदराबादचा एकतर्फी पराभव केला. यासह तिसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. आयपीएलची ट्रॉफी घेतल्यानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयानंतर आधी खेळाडूंनी मैदानावर जल्लोष साजरा केला. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आलं. ज्यात मिचेल स्टार्क, सुनील नरेन आणि रमनदीप सिंग यांच्यावर पैशांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले. संघातील खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील सदस्य देखील आनंद साजरा करताना दिसून आले. विजयाचा जल्लोष साजरा करताना खेळाडू डान्स करताना दिसून आले. यासह केकही कापला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

KKR vs SRH, IPL Final 2024: KKR च्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष! खेळाडूंच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल
IPL 2024 Prize Money: नुसता पैशांचा पाऊस! विजेत्या, उपविजेत्यासह ४ संघ मालामाल, ऑरेंज- पर्पल कॅप; कोणाला किती रुपये मिळाले? वाचा...

या सामन्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू डान्स करुन विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून आले. या व्हिडिओवर कोलकाता नाईट रायडर्स संघाचे फॅन्स आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

KKR vs SRH, IPL Final 2024: KKR च्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष! खेळाडूंच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल
IPL 2024 SRH Vs KKR Final: हैदराबादचा पराभवही झाला अन् नावावर लाजीरवाणा विक्रमही राहिला; काय आहे नकोसा रेकॉर्ड?

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला. कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी ११४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईठ रायडर्सकडून वेंकटेश अय्यरने अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com