IPL 2024 Prize Money: नुसता पैशांचा पाऊस! विजेत्या, उपविजेत्यासह ४ संघ मालामाल, ऑरेंज- पर्पल कॅप; कोणाला किती रुपये मिळाले? वाचा...

IPL 2024 Final Prize Money KKR vs SRH: केकेआरने एकतर्फी विजय संपादन करत ११ वर्षानंतर तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. आयपीएल सामन्यानंतर विजेत्या संघासह उपविजेत्या आणि अंतिम चार संघांवरही पैशांचा पाऊस पाडण्यात आला.
नुसता पैशांचा पाऊस! विजेत्या, उपविजेत्यासह ४ संघ मालामाल; ऑरेंज- पर्पल कॅप; कोणाला किती रुपये मिळाले? वाचा...
IPL 2024 Final Prize Money KKR vs SRH: Saamtv

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला इंडियन प्रिमीयर लीगचा (आयपीएल) थरार अखेर संपला. आयपीएलच्या अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैद्राबादला धुळ चारत आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सुरूवातीपासून सामन्यात आघाडी घेतलेल्या केकेआरने एकतर्फी विजय संपादन करत ११ वर्षानंतर तिसऱ्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. आयपीएल सामन्यानंतर विजेत्या संघासह उपविजेत्या आणि अंतिम चार संघांवरही पैशांचा पाऊस पाडण्यात आला. कोणाला किती रक्कम मिळाली, जाणून घ्या.

इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैद्राबादचा 8 गडी राखून पराभव केला. केकेआर संघ तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला. विजेतेपदासह केकेआर संघावर पैशांचा पाऊस पडला. विजेत्या कोलकाता संघाला आयपीएलच्या ट्रॉफीसह २० कोटी रुपये मिळाले. तर उपविजेता ठरलेल्या सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिन्सला 12.50 कोटी रुपये देण्यात आले.

त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या या अव्वल अंतिम चारमध्ये आलेल्या दोन संघांनाही कोटींची बक्षिसे मिळाली. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभूत होऊन राजस्थान रॉयल्स संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. राजस्थानच्या संघाला ७ कोटी रुपये मिळाले. तर चौथ्या स्थानावर असलेल्या आरसीबीच्या संघाला ६.५ कोटी रुपय मिळाले.

नुसता पैशांचा पाऊस! विजेत्या, उपविजेत्यासह ४ संघ मालामाल; ऑरेंज- पर्पल कॅप; कोणाला किती रुपये मिळाले? वाचा...
KKR vs SRH, IPL Final 2024: हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनला अश्रू अनावर;रडत रडत मैदानाबाहेर गेली- Video

दरम्यान, संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक २४ विकेट घेणाऱ्या हर्षल पटेलला जांभळ्या कॅपसह १० लाख रुपये मिळाले. विराट कोहलीने 741 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली आणि त्याला 10 लाख मिळाले. मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू सुनील नरेनलाही १० लाख रुपये मिळाले.

सर्वोत्कृष्ट पिच क्युरेटर आणि ग्राउंड स्टाफसाठी पुरस्कार आणि हैदराबादकडून 50 लाख रुपयांचा धनादेश मिळाला. याशिवाय पॉवर प्ले ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन आणि गेम चेंजर ऑफ द सीझन हे पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

नुसता पैशांचा पाऊस! विजेत्या, उपविजेत्यासह ४ संघ मालामाल; ऑरेंज- पर्पल कॅप; कोणाला किती रुपये मिळाले? वाचा...
SRH vs KKR, IPL 2024 Final: फायनलमध्ये हैदराबादचा लाजिरवाणा पराभव! काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com