KKR vs SRH, IPL Final 2024: हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनला अश्रू अनावर;रडत रडत मैदानाबाहेर गेली- Video

Kavya Maran Emotional Video: या सामन्यात हैदराबादचा पराभव समोर दिसताच काव्या मारनने मैदान सोडलं. सामन्यानंतर तिचा भावुक करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
KKR vs SRH, IPL Final 2024: हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनला अश्रू अनावर;रडत रडत मैदानाबाहेर गेली-  Video
kkr vs srh ipl 2024 twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपला ठसा उमटवत सनरायझर्स हैदराबादवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवण्यासाठी ११४ धावा करायच्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने ८ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीन काव्या मारनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

काव्या मारन संपूर्ण हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाला सपोर्ट करताना दिसून आली आहे. संघाने सामना जिंकल्यानंतर जल्लोष साजरा करताना दिसून आली. तर संघाच्या पराभवानंतर ती निराश झाल्याचंही पाहायला मिळालं.

KKR vs SRH, IPL Final 2024: हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनला अश्रू अनावर;रडत रडत मैदानाबाहेर गेली-  Video
KKR vs SRH, IPL 2024 Final Toss: फायनलमध्ये हैदराबादने जिंकला टॉस; KKR ला गोलंदाजीचं आमंत्रण; पाहा प्लेइंग ११

सनरायझर्स हैदराबाद संघाची फ्लॉप फलंदाजी पाहून काव्या मारन नाराज असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर जेव्हा संघाचा पराभव दिसू लागला. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. या सामन्यानंतर काव्या मारनचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात ती रडताना दिसून येत आहे. त्यानंतर ती मैदान सोडताना दिसून येत आहे. या भावुक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

KKR vs SRH, IPL Final 2024: हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनला अश्रू अनावर;रडत रडत मैदानाबाहेर गेली-  Video
KKR vs SRH, IPL 2024 Final Toss: फायनलमध्ये हैदराबादने जिंकला टॉस; KKR ला गोलंदाजीचं आमंत्रण; पाहा प्लेइंग ११

कोण आहे काव्या मारन?

काव्या मारनचे वडील सन ग्रुपचे मालक आहेत. ती माजी केंद्रीयमंत्री दयानिधी मारन यांची भाची आहे. सध्या ती सन टीव्ही नेटवर्कचा ओटीटी प्लॅटफॉर्म सन नेक्ट्सची प्रमुख आहे. तिचे सोशल मीडियावरही लाखो फॉलोवर्स आहेत. यासह ती सनरायझर्स हैदराबाद संघाची मालक देखील आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com