आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ११३ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना रहमानुल्लाह गुरबाज आणि वेंकटेश अय्यरने शानदार खेळी करत कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. दरम्यान काय आहेत हैदराबादच्या पराभवाची कारणं? जाणून घ्या.
नाणेफेक
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ज्यावेळी श्रेयस अय्यरला विचारलं गेलं त्यावेळी तो म्हणाला की, आम्हाला गोलंदाजी करायची होती आणि त्याने निर्णय सार्थ ठरवला. हैदराबादचा पहिला डाव ११३ धावांवर आटोपला. त्यामुळे कुठेतरी हैदराबादचा निर्णय चुकल्याचं दिसून येत आहे.
सलामी जोडी
अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड या जोडीने संपूर्ण हंगामात गोलंदाजांची धुलाई केली. मात्र प्लेऑफच्या सामन्यांमध्ये या जोडीला आपली छाप सोडता आली नाही. या सामन्यात अभिषेक शर्मा २ तर ट्रेविस हेड शून्यावर माघारी परतला. हे दोघेही फ्लॉप ठरल्यानंतर इतर कुठल्याही फलंदाज खेळपट्टी टीचून फलंदाजी करु शकला नाही.
गोलंदाज ठरले फ्लॉप
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी अवघ्या ११४ धावांची गरज होती. या धावांचा बचाव करताना कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाज विकेट्स घेण्यात फ्लॉप ठरले. धावा कमी आणि चेंडू जास्त होते. याच खेळपट्टीवर कोलकाताच्या गोलंदाजांनी हैदराबादचा फलंदाजांना अडकवून ठेवलं. मात्र दुसऱ्या डावात कोलकाताच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.