

नवी मुंबईतील खारघर स्टेशनवर घडली दुर्दैवी घटना
ट्रेनखाली झोकून देऊन महिलेची आत्महत्या
महिलेच्या आत्महत्येनंतर रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू
विकास मिरगणे, साम टीव्ही
नवी मुंबई रेल्वे अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्टेशनजवळ एका महिलेने धावत्या ट्रेनखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना घडली. ट्रेनखाली आल्याने तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले. महिलेच्या आत्महत्येनंतर खारघर रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली.
खारघर रेल्वे स्टेशनजवळ महिलेने आत्महत्या केल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. महिलेच्या अपघातानंतर ट्रेन काही वेळ थांबली होती. ट्रेन थांबल्याने रेल्वेमधील प्रवासी खाली उतरून स्टेशनवर पोहोचले. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांकडून आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर ट्रेन पुढील स्टेशनला निघाली.
आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही महिला नेमकी कुठे कामाला होती, तिचे वय काय होतं, याविषयी पोलिसांकडून तपास सुरू आहे. महिलेच्या आत्महत्येनंतर स्टेशनवरील प्रवाशांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्टेशनवरील वाढत्या अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
भायखळा आणि चिंचपोकळीदरम्यान रेल्वे रुळ ओलांडताना व्यक्तीचा अपघात
मध्य रेल्वेच्या भायखळा आणि चिंचपोकळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळ ओलांडताना एका व्यक्तीचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं. या अपघातामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी विस्कळीत झाली. अपघातामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.