Pat Cummins Statement: आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? पॅट कमिन्सने विराट, रोहित नव्हे तर या खेळाडूचं घेतलं नाव

Pat Cummins Favourite Indian Cricketer: आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? या प्रश्नाचं उत्तर देताना पॅट कमिन्सने भारतीय गोलंदाजाचं नाव घेतलं आहे.
pat cummins on favourite indian cricketer amd2000
pat cummins on favourite indian cricketer amd2000google

काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमारच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात पराभव झाला असला तरीदेखील हैदराबादचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग अजूनही मोकळा आहे. या संघाने ११ सामने खेळले असून ६ सामने जिंकले आहेत. दरम्यान या सामन्यानंतर त्याने काही प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण?

सनरायझर्स हैदराबाद आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला, तुझा आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं आहे. त्याने जसप्रीत बुमराहचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात बुमराहने ४ षटकात २३ धावा खर्च केल्या होत्या.

pat cummins on favourite indian cricketer amd2000
RCB Playoff Scenario: राजस्थानच्या पराभवाने RCB चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक

आयपीएलमध्ये बुमराहची शानदार कामगिरी...

जसप्रीत बुमराहने आयपीएल २०२४ स्पर्धेत आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो अव्वल स्थानी आहे. त्याने या स्पर्धेतील १२ सामन्यांमध्ये १६.५० च्या सरासरीने १८ गडी बाद केले आहेत. जसप्रीत बुमराह शानदार कामगिरी करत असला तरीदेखील मुंबई इंडियन्स संघाला या हंगामात चांगली कामगिरी करता आलेली नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने १२ सामने खेळले आहेत.

pat cummins on favourite indian cricketer amd2000
T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! IPL दरम्यान करतोय खास सराव; स्वत:च केला खुलासा

यादरम्यान केवळ ४ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ८ सामने गमवावे लागले आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. तर सनरायझर्स हैदराबादच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या संघाने ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. १२ गुणांसह हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. सध्या चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांचे प्रत्येकी १२-१२ गुण आहेत. नेट रनरेटच्या बळावर चेन्नईचा संघ आघाडीवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com