vinesh phogat twitter
Sports

Vinesh Phogat: तू आमच्यासाठी चॅम्पियन, सरकार करणार विनेश फोगाटचा सन्मान; १.५ कोटींचे बक्षीस जाहीर

Haryana Government Announced Prize For Vinesh Phogat: ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरूनही हरियाणाच्या जनतेच्या मनात विनेश जिंकली आहे. हरियाणा सरकार विनेश फोगाटचा सन्मान करणार आहे.

Priya More

हरियाणाची कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर विनेश फोगाटसह सर्व भारतीयांना मोठा धक्का बसला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर निराश झालेल्या विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केली. विनेशने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची घोषणा केली.

विनेश फोगाटला वजन मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे गोल्ड मेडल गमवावे लागले. तिला अपात्र ठरवल्यामुळे सिल्वर मेडल देखील तिला मिळवता आले नाही. ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरूनही हरियाणाच्या जनतेच्या मनात विनेश जिंकली आहे. हरियाणा सरकार विनेश फोगाटचा सन्मान करणार आहे.

हरियाणा सरकारने विनेश फोगाटचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री नायब सैनी यांनी विनेशला १.५ कोटी रुपये देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी पोस्टमध्ये असे लिहिले की, 'हरियाणाची आमची शूर मुलगी विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. काही कारणांमुळे ती कदाचित ऑलिम्पिक फायनल खेळू शकली नसली तरी देखील ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. आमच्या सरकारने ठरवले आहे की विनेश फोगाटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार करण्यात येईल.'

'हरियाणा सरकार ऑलिम्पिक सिल्वर मेडल विजेत्याला जे सर्व सन्मान, बक्षिसे आणि सुविधा देतात. ते विनेश फोगाटच्या कृतज्ञतेसाठी दिले जाईल.', असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हरियाणामध्ये सिल्वर मेडल जिंकण्यासाठी सरकार १.५ कोटी रुपयांचे बक्षीस देते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे आता विनेश फोगाटला १.५ कोटींचे बक्षीस मिळणार आहे.

विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात गोल्ड मेडलसाठी अंतिम सामना गाठला होता. पण वजन जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेशची प्रकृती बिघडली. विनेशने वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ती अपयशी ठरली. त्याचवेळी विनेशला डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT