विनेश फोगाटला सिल्व्हर मेडल देण्याची मागणी आता जगभरातून होऊ लागली आहे. जगभरातील प्रतिष्ठित खेळाडूंकडून मागणी होऊ लागली आहे. अमेरिकेचा कुस्तीपटू आणि 6 वेळा विश्वविजेता राहिलेला आणि ऑल्मिपिक गोल्ड विजेता जॉर्डन बरोजने देखील विनेश फोगटला सिल्व्हर मेडल देण्याची मागणी केली आहे. तर भारतातीलही दिग्गज खेळाडूंकडून आता सिल्व्हर मेडल देण्याची मागणी जोर लागली आहे.
शेकडो अडथळ्यांची शर्यत पार करत ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहचलेल्या विनेश फोगाटचा अवघ्या 100 ग्रॅम वजनाने घात केला आणि भारताचं सुवर्णस्वप्न भंगलं. फायनल खेळण्यापूर्वीच विनेशला अपात्र ठरल्यामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे. भारताची शान असलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरीस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो फ्री स्टाईल वजनी गटात जोरदार कामगिरी केली.
यासह फायनलमध्ये धडक देणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश सुवर्णपदक जिंकेल, असा विश्वास प्रत्येक भारतीयाला होता. मात्र फायनलपूर्वी विनेशनं वजन केलं आणि तिथेच तिचा घात झाला. कारण रात्रभर प्रयत्नानंतरही विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त भरलं. नियमांचा भंग झाल्यामुळे विनेशला थेट अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुऴे तिच्या कुटुंबीयांसह सा-या देशालाच मोठा धक्का बसला.
अमेरिकेचा कुस्तीपटू जॉर्डनने पोस्ट शेअर करत विनेश फोगटला सिल्व्हर मेडल देण्याची मागणी केली आहे. दरम्यान त्याने काही नियमांमध्ये बदल करण्याचंही सुचवलंय
दुसऱ्या दिवशी वजनात 1 किलोपर्यंत सूट मिळावी.
वजन मोजण्याची वेळ 8.30 वरून वाढवून 10.30 करण्यात यावी.
भविष्यात जर फायनलमध्ये पोहचलेला कुस्तीपटू वजन कमी करण्यात अपयशी ठरला, तर त्याला पराभूत घोषित करण्यात यावं.
विनेश फोगटला रौप्य पदक देण्यात यावं.
सेमीफायनलचा सामना जिंकल्यानंतर दोन्ही कुस्तीपटूंचं पदक निश्चित केलं गेलं पाहिजे. एखादा कुस्तीपटू वजन कमी करण्यास अपयशी ठरला तरीही त्याला सुवर्णपदक त्या खेळाडूला दिलं गेलं पाहिजे, ज्या खेळाडूने आपलं वजन कमी ठेवलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.