IND vs SL : किंग कोहलीला ३० धावसंख्याही पार करता आली नाही, विराटमुळेच भारताने मालिका गमावली

Virat Kohli : विराट कोहलीच्या लाजीरवाण्या कामगिरीनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येतोय. विराट कोहलीवर दारुण टीका होत आहे.
IND vs SL : विराटमुळेच भारताने मालिका गमावली, किंगला ३० धावसंख्याही पार करता आल्या नाहीत!
IND vs SL : विराटमुळेच भारताने मालिका गमावली, किंगला ३० धावसंख्याही पार करता आल्या नाहीत!Saam TV
Published On

IND vs SL, Virat Kohli Performance : रोहित शर्माच्या टीम इंडियाचा श्रीलंकामध्ये दारुण पराभव झालाय. २७ वर्षानंतर पहिल्यांदाच टीम इंडियाने (Team India) श्रीलंकामध्ये मालिका गमावली आहे. तीन सामन्याच्या वनडे मालिकेत (IND vs SL) भारताला २-० च्या पराभवाचा सामना करावा लागला. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतीय संघाला एकही सामना जिंकता आला नाही. आज भारतीय संघाला मालिका बरोबरीत करण्याची संधी होती, पण फलंदाजांनी पुन्हा हाराकिरी केली. त्यामुळे टीम इंडियाला ११० धावांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाला जबाबदार कोण? याची अनेक उत्तरे असतील. त्यामधीलच एक कारण म्हणजे विराट कोहली (VIrat Kohli) होय. तीन सामन्याच्या मालिकेत विराट कोहलीला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला ३० धावसंख्याही पार करता आली नाही.

कोहलीची बॅट शांतच

तीन सामन्याच्या वनडे मालिकेत विराट कोहलीची बॅट शांतच राहिली.एकीकडे हिटमॅन रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडला. पहिल्या दोन्ही सामन्यात रोहितने अर्धशतके ठोकली, अखेरच्या सामन्यातही रोहितने शानदार सुरुवात केली. पण रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फंलदाजी कोसळल्याचं दिसले. रोहित तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीकडून डाव सावरण्याची अपेक्षा होती, पण विराट कोहलीची बॅट शांतच राहिली. विराट कोहलीला या मालिकेत एकदाही ३० धावसंख्या ओलांडता आली नाही.

यंदाच्या अखेरच्या वनडेत विराट फ्लॉप -

निर्णायक वनडे सामन्यात विराट कोहलीला फक्त २० धावाच करता आल्या. यासाठी विराट कोहलीने १८ चेंडू घेतले. यामध्ये त्याने चार चौकार ठोकले. २०२४ मधील अखेरच्या वनडे सामन्यात रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. आता टीम इंडिया या वर्षी एकही वनडे सामना खेळणार नाही.

तीस धावसंख्याही ओलांडता आली नाही -

तीन सामन्याच्या वनडे मालिकेत विराट कोहलीला फक्त ५८ धावा काढता आल्या. विराट कोहलीला एकदाही ३० धावसंख्या ओलांडता आली नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या २४ इतकी राहिली. पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीला फक्त २४ धावा काढता आल्या होत्या. तर दुसऱ्या वनडेत त्याला १४ धावांचा पल्ला पार करता आला नाही. आज झालेल्या सामन्यात विराट कोहली फक्त २० धावाच करु शकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com