Rahul Gandhi On Vinesh Phogat: तू हार मानणाऱ्यांमधील नाही, संपूर्ण देश तुझ्या पाठीशी!; 'विनेश'च्या अपात्रतेवर राहुल गांधींनी ऑलिम्पिक संघाला केलं हे आवाहन

Vinesh Phogat Disqualification/Paris Olympic : विश्वविजेत्या पहलवानाला हरवून फायनलमध्ये धडक दिलेल्या आणि भारताची शान विनेश फोगाटला छोट्याशा कारणावरून अपात्र ठरवणं दुर्दैवी, असल्याचं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हटलं आहे.
Rahul Gandhi On Vinesh Phogat
Rahul Gandhi On Vinesh PhogatSaam Digital
Published On

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिमध्ये अपात्र ठरवण्यात आल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. ५० किलो वजनी गटात ती फायनलमध्ये पोहोचली होती. सलग चारवेळा विश्वविजेती आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई सुसाकीला तीने मात दिली होती होती, त्यामुळे तिंच गोल्ड मेडल निश्चित मानलं जात होतं. मात्र आज निर्णय आला आणि संपूर्ण देशाला धक्का बसला. दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून विनेश फोगाटला अपात्र घोषीत करणे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

विश्वविजेत्या पहलवानाला हरवून फायनलमध्ये धडक दिलेल्या आणि भारताची शान असलेल्या विनेश फोगाटला छोट्याशा कारणावरून अपात्र ठरवणं दुर्दैवी आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, भारतीय ऑलिम्पिक संघ या निर्णयाला आव्हान देईल आणि विनेशला न्याय मिळवून देईल. विनेश फोगाट हार मानणाऱ्यामंधील नाही, त्यामुळे ती कुस्तीच्या आखाड्यात पुन्हा परतेल आणि संपूर्ण ताकदीनिशी लढेल. विनेशने विदेशात देशाची मान उंचावली आहे, त्यामुळे आजसुद्धा संपूर्ण देश ताकदीनिशी तुझ्यासोबत उभे आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतात आज धक्कादायक बातमी आली. कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलं आहे. 50 किलो वजनी गटातील कुस्ती स्पर्धेत फक्त 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र करण्यात आलं. त्यामुळे तिला फायनलमध्ये भाग घेता येणार नाही. शिवाय ती रौप्य पदकासाठीही पात्र ठरणार नाही. ऑलिम्पिकच्या या निर्णयामुळे तिच्यासह संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.

Rahul Gandhi On Vinesh Phogat
Vinesh Phogat Disqualification: विनेश फोगाट अपात्र, पुण्यातील काका पवारांच्या डोळ्यांत अश्रू; म्हणाले, षडयंत्र...,

एका चॅम्पियनचीही खासियत असते, ते उत्तर मैदानातून देतात

विनेश फोगटने काल फायनलमध्ये धडक दिल्यानंतर राहुल गांधी यांनी तिचं अभिनंदन केलं होतं. एकाच दिवसात जगतिक पातळीवरच्या धुरंधर पहलनवांना आस्मान दाखवणाऱ्या विनेश फोगटसह संपूर्ण देश भावुक आहे. ज्यांनी ज्यांनी विनेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संघर्ष करायला लावला, त्यांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्यांना उत्तर मिळालं असेल. आज या खेळाडूंना रस्त्यावर अश्रू ढाळायला लावलेली सत्ता भारताच्या शूर मुलीसमोर धाराशाई झाली आहे. एका चॅम्पियन खेळाडूची ही ओळख असते, ते मैदानावरून उत्तर देतात. पॅरिसमधील विनेशच्या विजयाचा आवाज दिल्लीपर्यंत ऐकू येत आहे, असं राहुल गांधींनी काल दितं अभिनंदन केलं होतं आणि आज हा धक्कादायक निर्णय आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com