Pak Cricket Match Ticket Price: बऱ्याच वर्षांनी पाकिस्तानात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २१ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. हा कसोटी सामना रावलपिंडीच्या मैदानावर रंगणार आहे.
यापूर्वी झालेल्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत सामना पाहण्यासाठी प्रेक्षकच नव्हते. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेत प्रेक्षकांना मैदानात खेचून आणण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे.
भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही क्रिकेटचा प्रचंड क्रेझ आहे. एकीकडे भारतात होणाऱ्या सामन्यांची तिकीटं अवघ्या काही मिनिटात सोल्ड आऊट होतात. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने असले की, स्टेडियम रिकामेच दिसतात.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील फायनल आणि एलिमिनेटरच्या सामन्यावेळीही स्टेडियम रिकामे दिसून आले होते. रिकामे स्टेडियम भरुन काढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने तिकिटांची किंमत कमी केली आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीची किंमत ही खूपच कमी ठेवण्यात आली आहे. हा सामना क्रिकेट चाहत्यांना अवघ्या ५० रुपयात (भारतीय चलनात १५ रुपये) पाहता येणार आहे. जर एखाद्या क्रिकेट फॅनला हा सामना पाचही दिवस पाहायचा असेल, तर हे तिकीट अवघे २१५ रुपये इतके असणार आहे. म्हणजे भारतीय चलनात ही रक्कम केवळ ७२ रुपये इतकी आहे.
पाकिस्तान - शान मसूद (कर्णधार), सऊद शकील (उप कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आमिर जमाल, अबरार अहमद, बाबर आझम, खुर्रम शहजाद,मोहम्मद हुरेरा, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), मीर हमजा, कामरान गुलाम, मोहम्मद अली, नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक) शाहीन शाह आफ्रिदी.
बांग्लादेश - नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), जाकिर हसन, महमुदुल हसन जॉय, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम,शाकिब अल हसनतेजुल इस्लाम,लिट्टन कुमार दास, मेहदी हसन मिराज, नईम हसन, नाहिद राणा, शोरफुल इस्लाम , हसन महमूद, तस्कीन अहमद आणि सेय्यद खालिद अहमद
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.