Team India Full Schedule: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-० ने बाजी मारली. तर वनडे मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना ४३ दिवसांची विश्रांती मिळाली आहे. यापूर्वी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती हवी असायची तेव्हा युवा खेळाडूंना दौऱ्यावर पाठवलं जायचं. मात्र यावेळी कारण जरा वेगळंच आहे.
इथून पुढे ४३ दिवस भारताचा एकही सामना नसणार आहे. दरम्यान भारतीय संघ १९ सप्टेंबर रोजी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला आहे. कसं असेल पुढील वेळापत्रक?जाणून घ्या.
विश्रांतीनंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना - चेन्नई (१९ ते २३ सप्टेंबर)
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना - कानपुर (२७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर)
भारत विरुद्ध बांगलादेश पहिला टी-२० सामना - धर्मशाळा (६ ऑक्टोबर)
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा टी-२० सामना - दिल्ली (९ ऑक्टोबर)
भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा टी-२० सामना - हैदराबाद (१२ ऑक्टोबर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना - बंगळुरु (१६ ते २० ऑक्टोबर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना - पुणे (२४ ते २८ ऑक्टोबर)
भारत विरुद्ध न्यूझीलंड तीसरा कसोटी सामना - मुंबई (१ ते ५ नोव्हेंबर)
या मालिकेनंतर भारतीय संघ ४ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-२० सामना - डरबन (८ नोव्हेंबर)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दूसरा टी२० सामना - गकबेर्हा (१० नोव्हेंबर)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी२० सामना- सेंच्युरियन (१३ नोव्हेंबर)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथा टी२० सामना - जोहान्सबर्ग (१५ नोव्हेंबर)
दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. भारतीय संघा कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना - पर्थ (२२ ते २६ नोव्हेंबर)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोची सामना - एडिलेड (६ ते १० डिसेंबर )
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना - ब्रिसबेन (१४ ते १८ डिसेंबर)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना- मेलबर्न (२६ ते ३० डिसेंबर)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवा कसोटी सामना - सिडनी (३ ते ७ जानेवारी)
भारत विरुद्ध इंग्लंड,पहिला टी-२० सामना- चेन्नई (२२ जानेवारी)
भारत विरुद्ध इंग्लंड ,दूसरा टी-२०- कोलकाता (२५ जानेवारी)
भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी-२०- राजकोट (२८ जानेवारी)
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी२०- पुणे (३१ जानेवारी)
भारत विरुद्ध इंग्लंड ,पाचवा टी२०- मुंबई (२ फ्रेब्रुवारी)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.