Team India: विराटचा विश्वासू खेळाडू, रोहित येताच झाला संघाबाहेर; आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही

Hanuma Vihari: भारतीय कसोटी संघातील स्टार खेळाडू हनुमा विहारीला कसोटी संघात सातत्याने संधी मिळायची मात्र आता त्याला संधी मिळणंही कठीण झालं आहे.
Team India: विराटचा विश्वासू खेळाडू, रोहित येताच झाला संघाबाहेर; आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही
hanuma vihariyandex
Published On

भारतीय क्रिकेट संघात एकापेक्षा स्टार फलंदाज आहेत. काही असे विश्वासू खेळाडू देखील आहेत, जे मैदानावर असेल की, विरोधी संघातील खेळाडू थरथर कापतात.

तर भारतीय क्रिकेट फॅन्सला विश्वास असतो की, सामना अजूनही आपल्याच हातात आहे. मात्र रोहित शर्मा कर्णधार बनल्यानंतर आणि गौतम गंभीर हेड कोच बनल्यानंतर, भारतीय खेळाडूची कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आली आहे.

Team India: विराटचा विश्वासू खेळाडू, रोहित येताच झाला संघाबाहेर; आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही
Imane Khelif, Paris Olympics: 'मी महिला आहे..' पुरुष म्हणून ट्रोल होणाऱ्या इमान खलीफने पटकावलं गोल्ड मेडल

भारतीय संघाची भिंत

हा तोच खेळाडू आहे ज्याला एकेकाळी भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखलं जायचं. हा तोच खेळाडू आहे ज्याने भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून दिली होती. आता तुम्हालाही वाटत असेल की, आम्ही चेतेश्वर पुजाराबद्दल बोलतोय. पण तुमचा अंदाज चुकतोय. आम्ही बोलतोय, भारताचा मधल्या फळीतील भक्कम फलंदाज हनुमा विहारी बद्दल.

हनुमा विहारी गेला तरी कुठे?

हनुमा विहारी (Hanuma Vihari) हा भारतीय संघातील सर्वात विश्वासू खेळाडू म्हणून ओळखला जायचा. जेव्हा संधी मिळायची तेव्हा तो सलामीला फलंदाजीला यायचा. तर कधीकधी तो ५ किंवा ६ क्रमांकावर फलंदाजीला यायचा. रवी शास्त्री प्रशिक्षक आणि विराट कोहली कर्णधार असताना या खेळाडूला प्राधान्याने स्थान दिलं जात होतं. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर त्याला संधी मिळणं कमी झालं. आता गंभीरच्या काळात तो कुठे गायब झालाय हेच माहीत नाही.

श्रेयस अय्यरला दिली संधी

रोहित शर्मा कसोटी संघाचा कर्णधार बनल्यानंतर राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकांची भूमिका सांभाळली. तेव्हापासून श्रेयस अय्यरला कसोटी संघात स्थान दिलं जात आहे. त्यामुळे हनुमा विहारीला संघात स्थान मिळणं कठीण झालं आहे. श्रेयस अय्यरनेही या क्रमांकावर खेळताना महत्वपूर्ण खेळी केली आहे. त्यामुळे हनुमा विहारीला संधी मिळणं कमी झालं.

Team India: विराटचा विश्वासू खेळाडू, रोहित येताच झाला संघाबाहेर; आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही
Paris Olympics 2024: दोघींना १-१ गुण, तरीही रितिका हुडाचा पराभव! सामना गमावूनही मेडल मिळणार?

ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात मोलाची भूमिका

जेव्हा जेव्हा गाबा कसोटीचा उल्लेख केला जाईल तेव्हा हनुमा विहारीचं नाव आवर्जून घेतलं जाईल. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना,संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होते. त्यावेळी हनुमा विहारीने शानदार खेळी करत मैदान सोडलंच नाही. दुखापतग्रस्त असतानाही तो खेळपट्टीवर टिकून राहिला. या विजयाच्या बळावर भारताने हा सामना जिंकला आणि मालिकाही जिंकली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com