Hanuma Vihari Captaincy: गाबा कसोटीचा हिरो हनुमा विहारीला कर्णधारपद का सोडावं लागलं? वाचा संपूर्ण प्रकरण

Hanuma Vihari Captaincy News: भारताचा स्टार फलंदाज हनुमा विहारीला आंध्रप्रदेश संघाचं कर्णधारपद गमवावं लागलं आहे. काय आहे कारण? वाचा संपूर्ण प्रकरण.
star indian cricketer hanuma vihari left the captaincy of andhra pradesh know the full story here
star indian cricketer hanuma vihari left the captaincy of andhra pradesh know the full story heretwitter
Published On

Hanuma Vihari News In Marathi:

भारताचा स्टार फलंदाज हनुमा विहारीला आंध्रप्रदेश संघाचं कर्णधारपद गमवावं लागलं आहे. हनुमा विहारीने म्हटलं आहे की, संघातील १७ व्या खेळाडूवर ओरडल्यामुळे त्याला संघाचं कर्णधारपद गमवावं लागलं आहे.

भारतात सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत तो आंध्रप्रदेश संघाचं नेतृत्व करत होता. मात्र त्याला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडलं गेलं आहे. याची माहिती त्याने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत दिली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या. (Hanuma Vihari)

हनुमा विहारीने म्हटले की, ' आम्ही लढा दिला. मात्र पुन्हा एकदा आंध्रप्रदेशला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. बंगालविरद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात मी संघाचा कर्णधार होतो. त्या सामन्यात मी संघातील १७ व्या खेळाडूवर ओरडलो. त्या खेळाडूने त्याच्या वडिलांकडे तक्रार केली. त्याचे वडील राजकारणात आहेत. त्यांनी मला राजीनामा द्यायला सांगितलं.'

star indian cricketer hanuma vihari left the captaincy of andhra pradesh know the full story here
Rohit Sharma Statement: या खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दार कायमचे बंद? रोहित शर्माचा मोठा खुलासा

कोण आहे तो खेळाडू?

हनुमा विहारी पुढे म्हणाला की, ' आमच्या दोघांमध्ये कुठलेही वैयक्तिक वाद नव्हते. मी माझ्या संघाला प्राधान्य दिलं. मात्र बोर्डने त्या खेळाडूला प्राधान्य दिलं. एक खेळाडू संघापेक्षा मोठा झाला आहे. ७ वर्षांपासून मी या संघासाठी खूप काही केलं आहे. यादरम्यान मला भारतीय संघासाठी १६ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या मात्र तरीही मी संघासोबत उभा राहिलो. यापूर्वी मी काहीच म्हटलं नाही, मात्र मी अजून सहन करू शकत नाही. एक संघ म्हणून आम्ही चांगली कामगिरी करतोय. मात्र बोर्डाला हे पाहवत नसावं. (Cricket news in marathi)

star indian cricketer hanuma vihari left the captaincy of andhra pradesh know the full story here
IND vs ENG: ध्रुव जुरेलच्या या खास प्लानमुळे जिंकली टीम इंडिया! सामन्यानंतर स्वतःच केला मोठा खुलासा

हनुमा विहारीने ज्या खेळाडूचा उल्लेख केला आहे. त्या खेळाडूनेही आपली बाजू मांडत म्हटले की, ' माझं नाव परुधवी आहे. मी तोच खेळाडू आहे, ज्याचा तुम्ही शोध घेत आहात. मात्र जे काही म्हटलं जात आहे ते सर्व खोटं आहे. हा खेळा माझ्यापेक्षा आणि इतर सर्वांपेक्षाही मोठा आहे. त्या दिवशी काय झालं हे सर्वांना माहित आहे. त्याने सहानुभूती घेण्याऐवजी आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com