suryakumar yadav hardik pandya yandex
क्रीडा

Team India Captain: ना हार्दिक,ना सूर्या; शुभमन गिल होणार भविष्यातील कर्णधार! ही आहेत प्रमुख कारणं

Ankush Dhavre

Team India Future Captain: भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची (Team india) घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणिा ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याचं नाव आघाडीवर होतं. मात्र ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आला आहे.

रोहितने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र बीसीसीआयने मोठा निर्णय घेत ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलंय. मात्र एका बीसीसीआयने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे वनडे आणि टी-२० संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. तो वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये ही जबाबदारी पार पाडताना दिसून येणार आहे.

गिल होणार भविष्यातील कर्णधार

गौतम गंभीरने ही जबाबदारी स्वीकारताच गंभीरवर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान गिलवर ही जबाबदारी का सोपवली गेली? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर यामागचं प्रमुख कारण म्हणजे शुभमन गिलचं वय. शुभमन गिल अवघ्या २४ वर्षांचा आहे. रोहित शर्मा ३७ वर्षांचा आहे. तर सूर्यकुमार यादव ३३ वर्षांचा आहे.

हे खेळाडू काही वर्ष खेळतील, त्यानंतर निवृ्त्ती जाहीर करतील. तोपर्यंत गिलला या दिग्गज खेळांडूकडून नेतृत्वाचे धडे घेता येतील. त्यामुळे रोहित आणि सूर्याचा उत्तराधिकारी म्हणून गिलची निवड करण्यात आली आहे. यावरुन हे स्पष्ट आहे की, रोहित आणि सूर्यानंतर गिल भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो.

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय टी-२० संघाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली होती. या दौऱ्यावरील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाने ४-१ ने दमदार कमबॅक केलं.आयपीएल २०२४ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. गुजरातचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT