Gautam Gambhir: सूर्या की हार्दिक? कॅप्टन्सीच्या शर्यतीत कोण आघाडीवर? गौतम गंभीरचा मोठा खुलासा

Gautam Gambhir On Team India Captaincy: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पुढील कर्णधार कोण याबाबत गंभीरने खुलासा केला आहे.
Gautam Gambhir: सूर्या की हार्दिक? कॅप्टन्सीच्या शर्यतीत कोण आघाडीवर? गौतम गंभीरचा मोठा खुलासा
suryakumar yadav with hardik pandyayandex
Published On

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहितने निवृत्ती जाहीर केल्यानंतर बीसीसीआयने नव्या कर्णधाराचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या पदासाठी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याच्या नावाची चर्चा होत आहे. तर सूर्यकुमार यादवचं नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं जात आहे.

Gautam Gambhir: सूर्या की हार्दिक? कॅप्टन्सीच्या शर्यतीत कोण आघाडीवर? गौतम गंभीरचा मोठा खुलासा
Team India T20I Captain: सूर्या की हार्दिक? कर्णधारपदासाठी रोहितचा सपोर्ट कुणाला?

झिम्बाब्वेला ४-१ ने लोळवल्यानंतर भारतीय संघ आता श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर गौतम गंभीर पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर टी-२० संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. .या दौऱ्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून २७ जूलैपासून टी-२० आणि वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी (१७ जुलै) भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार होती. मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

गौतम गंभीर आणि बीसीसीआयचे अधिकारी यांच्याच अनऑफिशियल चर्चा झाली. या चर्चेदरम्यान रोहितनंतर टी-२० संघाचा कर्णधार कोण? या विषयावर चर्चा झाली असेल. गंभीरने थेट सूर्यकुमार यादवचं नाव नाही घेतलं. मात्र गंभीरला कर्णधार म्हणून सूर्याच हवा आहे.

Gautam Gambhir: सूर्या की हार्दिक? कॅप्टन्सीच्या शर्यतीत कोण आघाडीवर? गौतम गंभीरचा मोठा खुलासा
Team India Captaincy: रोहितनंतर कोण होणार वनडे संघाचा कर्णधार? हे आहेत पर्याय

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने हिन्दुस्तान टाईम्सला म्हटले की, ' गंभीरने कॉलवर असताना थेट सूर्यकुमार यादवचं नाव घेतलं नाही. मात्र त्याने स्पष्ट केलंय की, त्याला अशा कर्णधारासोबत काम करायचं आहे, जो वर्कलोडमध्ये अडकून राहणार नाही.' यावरुन त्याने नकळत सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवणार असल्याचा इशारा दिला आहे.

हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनाही नेतृत्वाचा अनुभव आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याकडे भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यासह टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतही त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर रोहित आणि हार्दित दोघेही संघाबाहेर असताना सूर्यकुमार यादवकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com