आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेटच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्माने टी -२० संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. तर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे भारतीय संघाला गौतम गंभीरच्या रुपात नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. तर टी -२० संघाच्या कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. दरम्यान रोहितनंतर भारतीय वनडे संघाचा कर्णधार कोण होणार? जाणून घ्या कोण आहेत प्रबळ दावेदार.
हार्दिक पंड्याचं नाव टी -२० संघाच्या कर्णधारपदासाठीही चर्चेत आहे. त्याच्याकडे नेतृत्वाचा अनुभव देखील आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना गुजरात टायटन्स संघाने पहिल्याच हंगामात आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. त्यानंतर दुसऱ्या हंगामात त्याने आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. यासह त्याच्या नेतृत्वात माजी भारतीय खेळाडू कपिल देव यांची झलक दिसते. त्यामुळे हार्दिक वनडे संघाचा कर्णधार होऊ शकतो.
रिषभ पंत आपल्या उत्कृष्ट यष्टिरक्षण आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. रिषभकडेही नेतृत्व करण्याचे सर्व गुण आहेत. रिषभ पंत आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करतो. मुख्य बाब म्हणजे तो यष्टिरक्षक आहे. त्यामूळे त्याला यष्टीमागून तो सामना आपल्या नियंत्रणात ठेऊ शकतो.
श्रेयस अय्यर देखील भारतीय वनडे संघाचा कर्णधार बनण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. त्याला नेतृत्वाचा भरपूर अनुभव आहे. त्याने अनेकदा मध्यक्रमात महत्वाची खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. दरम्यान त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली होती. भारतीय संघाला रोहित सारखाच निडर आणि धाडसी निर्णय घेणारा कर्णधार हवा आहे. हे सर्व गुण श्रेयस अय्यरमध्ये आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.