IND Vs SL: उत्तम कामगिरी करुनही ५ खेळाडूंना डच्चू , संजू सॅमसनसह 'या' खेळाडूंचा श्रीलंका दौऱ्यात बॅड लक

Team India Sri Lanka Tour : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा नवा T20 कर्णधार बनवण्यात आले आहे.
IND Vs SL:  उत्तम कामगिरी करुनही ५ खेळाडूंना डच्चू , संजू सॅमसनसह 'या' खेळाडूंचा श्रीलंका दौऱ्यात बॅड लक
IND vs SLSaam Digital
Published On

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळचा हा पहिल्याच विदेश दौरा असून पहिल्यांदाच त्याने टीम इंडियाची निवड केलीय. श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात मात्र उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही डच्चू देण्यात आलाय. यामुळे अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

ऋतुराज-अभिषेक शर्मा ड्रॉप

झिम्बाब्वे दौऱ्यावर चमकदार कामगिरी करणाऱ्या रुतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांना टी-२० संघातून वगळण्यात आलंय. अभिषेक शर्माने झिम्बाब्वेमध्ये शानदार शतक झळकावलं होतं. तर गायकवाडने 66.50 च्या सरासरीने 133 धावा केल्या होत्या. तरीही त्याला डच्चू मिळालाय.

संजू सॅमसन वनडे संघातून बाहेर

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. मात्र वनडे संघातून त्याला वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे आपल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकलं होतं, तरिही त्याचा पत्ता कट करण्यात आला.

मुकेश कुमार, आवेश खान बाद

वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि आवेश खान हे दोघेही झिम्बाब्वे दौऱ्यावर संघाचा भाग होते. दोघांनी चांगली कामगिरी केली होती. तरीही आता त्यांना श्रीलंका दौऱ्यासाठी संधी मिळाली नाही. त्यांना टी-२० संघात निवड झाली नाही ना एकदिवसीय संघात त्यांना स्थान देण्यात आलं.

श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी कसा असेल भारतीय वनडे संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, हर्षित राणा,रियान पराग, अक्षर पटेल,

भारताचा टी-२० संघ -

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग,हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल,खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

IND Vs SL:  उत्तम कामगिरी करुनही ५ खेळाडूंना डच्चू , संजू सॅमसनसह 'या' खेळाडूंचा श्रीलंका दौऱ्यात बॅड लक
Dinesh Lad: रोहित शर्माने WTC अन् WC ही जिंकावा! कोच दिनेश लाड यांचं विठूरायाला साकडं- VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com