Suryakumar Yadav: टीम इंडियासाठी गुड न्यूज! या तारखेला सूर्यकुमार यादव उतरणार मैदानात

Suryakumar Yadav News: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करणार आहे.
suryakumar yadav
suryakumar yadavsaam tv news
Published On

Suryakumar Yadav Comeback:

नुकताच भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ करत ३-० ने बाजी मारली आहे. ही टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाची शेवटची टी-२० मालिका होती.

आता सर्व खेळाडू आयपीएल खेळताना दिसून येतील. दरम्यान टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करणार आहे.

सूर्यकुमार यादव हर्नियावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जर्मनीला गेला होता. त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. लवकरच तो नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत सराव करताना दिसून येणार आहे. सूर्यकुमार यादव आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करतो. बीसीसीआयने अशी शक्यता वर्तवली आहे की, तो आगामी आयपीएल स्पर्धेपूर्वी पूर्णपणे फिट होऊ शकतो.

suryakumar yadav
IND vs AFG Super Over: आधी टाय, सुपर ओव्हर अन् पुन्हा एकदा सुपर ओव्हर; सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा Video

सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-२० संघातील आक्रमक फलंदाज असून सध्या तो आयसीसीच्या टी-२० फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याच्यावर बुधवारी (१७ जानेवारी) जर्मनीतील म्यूनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली शस्त्रक्रिया पार पडली.

यापूर्वी २०२२ मध्ये जर्मनीतील म्यूनिकमध्ये केएल राहुलवर हर्नियाची शस्त्रक्रिया पार पडली होती. ही शस्त्रक्रिया होऊन एक महिना झाल्यानंतर त्याने कमबॅक केलं होतं. मात्र सूर्यकुमारला पूर्णपणे फिट होण्यासाठी २ महिन्यांचा अवधी लागु शकतो. (Latest sports updates)

suryakumar yadav
Rohit Sharma: 'तो सहसा असं करत नाही...' विराटबाबत बोलताना रोहितचं मोठं वक्तव्य

दक्षिण आफ्रिकेत झाला होता दुखापतग्रस्त..

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर हार्दिक पंड्या आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या हाती सोपवण्यात आली होती. या मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com