Suryakumar Yadav News: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दिक पाठोपाठ सूर्यकुमार यादव IPL मधून बाहेर पडणार? समोर आलं मोठं कारण

IPL 2024: मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. वाचा काय आहे कारण
suryakumar yadav
suryakumar yadavgoogle
Published On

Suryakumar Yadav Injury Update:

भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय टी-२० संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव क्षेत्ररक्षण करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

एका रिपोर्टमध्ये त्याला स्पोर्ट्स हर्निया झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला पूर्णपणे फिट होण्यासाठी ८ ते ९ आठवड्यांचा अवधी लागणार आहे. (Latest sports updates)

suryakumar yadav
IND vs AFG: टीम इंडियाची प्लेइंग ११ ठरली! अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० साठी या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

जर्मनीत होणार शस्त्रक्रिया...

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव हर्नियाच्या सर्जरीसाठी जर्मनीला जाणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की,'सूर्याला स्पोर्ट्स हर्निया असल्याचं समोर आलं आहे. सध्या तो NCA मध्ये असून येत्या २ ते ३ दिवसात तो जर्मनीतील म्यूनिखसाठी रवाना होणार आहे. या कारणामुळे तो रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही. तसेच तो मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.'

suryakumar yadav
IND W vs AUS W: भारतीय महिला क्रिकेट संघाचा दारूण पराभव; ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट राखून विजय

तसेच ते पुढे म्हणाले की,'जूनमध्ये भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप खेळायचा आहे. या स्पर्धेसाठी फिट होण्यासाठी सूर्यकुमार यादवला पूर्ण वेळ दिला जाईल. तो भारतीय संघासाठी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत हुकमी एक्का ठरु शकतो.' नुकताच आयसीसीने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा वेस्टइंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. या स्पर्धेला १ जूनपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना २९ जून रोजी रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com