Sunil Gavaskar Statement: रिषभ पंत की संजू सॅमसन; कोण आहे बेस्ट? सुनील गावस्करांनी स्पष्टच सांगितलं

Rishabh Pant vs Sanju Samson: रिषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघांमधून कोणाला स्थान मिळायला हवं?
Sunil Gavaskar Statement: रिषभ पंत की संजू सॅमसन; कोण आहे बेस्ट? सुनील गावस्करांनी स्पष्टच सांगितलं
sanju samson rishabh pantsaam tv

आयसीसी टी -२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मात्र भारतीय संघासाठी यष्टिरक्षण कोण करणार? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. संजू सॅमसनने आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. रिषभ पंतने देखील आक्रमक फलंदाजी केली होती. दरम्यान रोहित शर्माने सराव सामन्यात रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळवलं, त्यामुळे आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रिषभ पंत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत दिसेल हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. या सामन्यानंतर सुनील गावस्कर यांनी संजू सॅमसन आणि रिषभ पंतबाबत मोठं वक्तव्यं केलं आहे.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, ' हो, मला असं वाटतं की रिषभ पंत हा संजू सॅमसनपेक्षा उत्कृष्ट यष्टिरक्षक आहे. मी इथे फलंदाजीची तुलना करत नाहीये. रिषभ पंतने गेल्या काही सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली आहे. तर संजू सॅमसनने देखील आयपीएल स्पर्धेत शानदार फलंदाजी केली.'

Sunil Gavaskar Statement: रिषभ पंत की संजू सॅमसन; कोण आहे बेस्ट? सुनील गावस्करांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

तसेच ते पुढे म्हणाले की, 'सराव सामन्यात जर संजू सॅमसनने चांगली खेळी केली असती. तर निश्चितच त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळू शकले असते. मात्र असं करण्यात तो अपयशी ठरला आहे.' संजू सॅमसनला रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली होती. मात्र तो १ धाव करत माघारी परतला. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिषभ पंतने ५३ धावांची शानदार खेळी केली .

Sunil Gavaskar Statement: रिषभ पंत की संजू सॅमसन; कोण आहे बेस्ट? सुनील गावस्करांनी स्पष्टच सांगितलं
IND vs BAN, Warm Up Match: पहिला पेपर पास! टीम इंडियाचा बांगलादेशवर दणदणीत विजय

' गेल्या २-३ सामन्यांमध्ये संजू सॅमसनला धावा करता आलेल्या नाहीत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावा करून त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. जर त्याने या सामन्यात ५० -६० धावा केल्या असत्या, तर त्याच्यावर कोणीच प्रश्न उपस्थित केला नसता. मात्र आता निवडकर्ते रिषभ पंतला प्लेइंग ११ इलेव्हनमध्ये स्थान देण्याचा विचार करतील. ' असं सुनील गावस्कर म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com