MI VS SRH x
Sports

MI VS SRH : 1,W,0,0,W,0.. एक रनसाठी मुंबईची धावाधाव, हार्दिकनंतर नमनही आउट, शेवटी तिलकने मारला विजयी चौकार

MI VS SRH IPL 2025 : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या महामुकाबल्यामध्ये मुंबईचा विजय झाला आहे. या सामन्यात शेवटपर्यंत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळाले.

Yash Shirke

MI VS SRH Match Highlights : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्यात मुंबईचा विजय झाला आहे. घरच्या स्टेडियमवर मुंबईने हैदराबादला पछाडले आहे. आयपीएल २०२५ मधला हा मुंबईचा तिसरा विजय आहे. या विजयामुळे मुंबईच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय नेटरनरेटमध्येही सुधारणा झाली आहे.

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हैदराबाद संघाचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरले. त्यांनी २० ओव्हर्समध्ये एकूण १६२ धावा केल्या. हे आव्हान पेलावत मुंबईने १६६ धावा केल्या आणि सामना जिंकला.

त्यानंतर मुंबईचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी आले. रोहित शर्माने २६ धावा केल्या. रायन रिकल्टनने २६ धावा केल्या. दरम्यान विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी खेळ पुढे नेला. जॅक्स ३६ धावांवर, तर सूर्या २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी मोर्चा सांभाळला. हार्दिक पंड्याने २१ धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये अजबगजब ट्विस्ट पाहायला मिळाला. १ धाव बाकी असताना आधी हार्दिक पंड्या बाद झाला. त्यानंतर नमन धीरची विकेट पडली. शेवटच्या ओव्हरमध्ये झालेल्या ड्राम्यानंतर शेवटी तिलक वर्माने चौकार मारुन सामना मुंबईला जिंकवून दिला.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Police : धुळ्यात एमडी ड्रग्सचा साठा हस्तगत; धुळे पोलिसांकडून कारवाई, दोघे ताब्यात

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT