
MI VS SRH IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचे ठरवले. तेव्हा सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज मैदानामध्ये उतरले. सामन्याच्या सुरूवातीपासूनच मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवर वचक ठेवला.
सलामीवीर अभिषेक शर्मा ४० धावांवर बाद झाला. त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि इशान किशन मैदानामध्ये फलंदाजी करत होते. पुढे २ धावांवर इशान किशन बाद झाला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीसह हेडने खेळ पुढे नेला. आजच्या सामन्यात ट्रेव्हिस हेडला तब्बल दोनदा जीवनदान मिळाले. ट्रेव्हिस हेड हा हार्दिक पंड्याच्या ओव्हरमध्ये तब्बल दोनदा कॅचआउट झाला. पण तरीही तो मैदानाबाहेर गेला नाही.
नेमकं काय घडलं?
हार्दिक पंड्या दहाव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला आला. तेव्हा हेडने शॉट मारला आणि विल जॅक्सने त्याचा कॅच पकडला. ट्रेव्हिस हेडची विकेट पडल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला. पण लगेच अंपायर्सनी नो-बॉलची घोषणा केली. नो-बॉलमुळे हेडला जीवनदान आणि फ्री-हीट दोन्ही मिळाले. फ्री हिटवर ट्रेव्हिस हेटने पुन्हा जोरदार शॉट मारला. पुन्हा बॉल मुंबईच्या खेळाडूने पकडला. फ्री हिट असल्याने हेडला परत एकदा जीवनदान मिळाले. त्यानंतर लगेच विल जॅक्सच्या ओव्हरमध्ये ट्रेव्हिस हेड बाद झाला.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.
सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -
अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.