MI VS SRH : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, धुरंदर खेळाडूला दुखापत; सामन्यातून बाहेर

MI VS SRH IPL 2025 : वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध हैदराबाद हा सामना सुरु आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा खास खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सला धक्का बसला आहे.
MI VS SRH
MI VS SRHx
Published On

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला सुरूवात झाली आहे. मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीपासूनच मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. काही अंशी त्यांना यश देखील मिळाले. सामन्यादरम्यान कर्ण शर्मा क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला आहे.

दीपक चहर तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याने अभिषेक शर्माला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. ओव्हरच्या सुरुवातीला ३ डॉट बॉल टाकले. नंतर अभिषेकने एक चौकार मारला. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर अभिषेक शर्माने मिड विकेटच्या दिशेने शॉट मारला. तेथे कर्ण शर्मा उभा होता. कर्ण शर्माने बॉल पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नात त्याच्या बोटांना जखमा झाल्या. दुखापतग्रस्त झाल्याने कर्ण शर्माला मैदानाबाहेर नेण्यात आले. कर्ण शर्मा दिल्ली विरुद्धच्या मुंबईसाठी लकी ठरला होता. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळताना त्याने ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे या खेळामुळे कर्णला आज प्लेईंग ११ मध्ये संधी मिळाली.

MI VS SRH
Umpire Death : सामना सुरू असताना मैदानात अंपायरचा मृत्यू, क्रिकेट विश्वात हळहळ

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराजयर्स हैदराबाद हा आयपीएल २०२५ मधील ३३ वा सामना सुरु झाला आहे. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सनराजयर्स हैदराबादच्या फलंदाजांना जास्त धावा न करु देण्याचे आव्हान मुंबईच्या गोलंदाजांसमोर आहे.

MI VS SRH
IPL Playoffs Scenario 2025 : 6 पैकी 4 सामन्यात पराभव, तरीही प्लेऑफचे दरवाजे मुंबई इंडियन्ससाठी खुले, कसं आहे समीकरण?

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.

MI VS SRH
IPL दरम्यान टीम इंडिया अडचणीत; प्रशिक्षकासह तिघांची हकालपट्टी, कारण ऐकून आश्चर्य वाटेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com