
भारतासह जगभरात आयपीएल २०२५ ची धामधुम पाहायला मिळत आहे. अशातच बीसीसीआयने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील बऱ्याचजणांची हकालपट्टी करण्यात आली आहे. टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासह तीन जणांना काढून टाकले आहे. आयपीएल २०२५ नंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दैनिक जागरणने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि प्रशिक्षक सोहम देसाई यांना पदावरुन काढण्यात आले आहे. नायर, दिलीप आणि देसाई यांना गेल्या आठवड्यात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. सध्या टीम इंडियाच्या क्रिकेट बोर्डावर कोणत्याही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार नसल्याचे बीसीसीआयच्या एका सूत्राने द इंडियन एक्स्प्रेला सांगितले आहे.
अभिषेक नायर यांच्या जागी भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमणूक असलेले सिंतशू कोटक यांची निवड होईल. टी दिलीप यांच्या जागी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी रायन टेन डेस्केट यांच्याकडे दिली जाईल. तर सोहन देसाई यांच्या पदावर ऍड्रियन ल रुक्स यांची नियुक्ती केली जाईल असे म्हटले जात आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खराब कामगिरी केल्याने बीसीसीआय गौतम गंभीर आणि अन्य कोचिंग स्टाफवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ड्रेसिंग रुममधील संवाद लीक झाल्याने वाद चिघळला होता. दरम्यान टीम इंडियाने खराब कामगिरी केली होती. बीजीटीमध्ये ऑस्ट्रेलियाने ३-१ च्या फरकाने भारतावर मात केली होती. या कारणांमुळे बीसीसीआयद्वारे ही कारवाई केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.