
MI VS SRH Highlights : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील थरारक सामना रंगतदार ठरत आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात केली. २० ओव्हर्समध्ये हैदराबादने १६२ धावा केल्या.
सलामीवीर अभिषेक शर्मा ४० धावा करून बाद झाला. त्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि इशान किशनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, इशान किशन केवळ २ धावा करून माघारी परतला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीने हेडला साथ दिली. हेड २८ धावा करून बाद झाला, तर नितीश रेड्डीने १९ धावांचे योगदान दिले. हेनरिक क्लासेनने फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न केला. पण बुमराहने त्याला बोल्ड केले. क्लासेनने ३७ धावा केल्या. पॅट कमिन्स आणि अनिकेत वर्मा यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये काही दमदार फटके मारत हैदराबादची धावसंख्या १६० च्या पुढे नेली.
मुंबईच्या गोलंदाजांनी त्याचा क्लास दाखवला. मुंबईने हैदराबादला फक्त धावांवर रोखले. सुरुवातीपासूनच गोलंदाजांनी हैदराबादच्या खेळाडूंवर दबाव ठेवला होता. या दबावामुळे हैदराबादचे फलंदाज जास्त धावा करु शकले नाही. मुंबईकडून विल जॅक्सने २ विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी गडी बाद केले. सामना जिंकण्यासाठी मुंबईला २० ओव्हर्समध्ये १६३ धावा कराव्या लागणार आहेत.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.
सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -
अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.