MI VS SRH : रायन रिकल्टन आउट, 'तो' एक निर्णय झाला अन् बॅटिंगसाठी आलेला सूर्या माघारी गेला, नेमकं काय घडलं?

MI VS SRH IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद या सामन्यादरम्यान बऱ्याच आगळ्या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. कॅचआउट झालेला रायन रिकल्टन नो-बॉलमुळे पुन्हा फलंदाजी करण्यासाठी आला.
MI VS SRH IPL 2025
MI VS SRH IPL 2025X
Published On

वानखेडे स्टेडियमवर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद रंगला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकली आणि मुंबईने प्रथम गोलंदाजी केली.दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबादच्या खेळाडूंनी २० ओव्हर्समध्ये एकूण १६२ धावा केल्या. मुंबईला जिंकण्यासाठी १६३ धावांचे आव्हान हैदराबादने ठेवले.

MI VS SRH IPL 2025
MI VS SRH : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, धुरंदर खेळाडूला दुखापत; सामन्यातून बाहेर

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यात अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळाल्या. मुंबईची फलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर रायन रिकल्टन आणि विल जॅक्स फलंदाजी करत होते. दरम्यान हैदराबादच्या झीशान अन्सारीच्या ओव्हरमध्ये आगळावेगळा ड्रामा पाहायला मिळाला. आउट झालेला रायन रिकल्टन मैदानाबाहेर गेला. पण त्याला पुन्हा एकदा फलंदाजीसाठी बोलवण्यात आले.

MI VS SRH IPL 2025
Umpire Death : सामना सुरू असताना मैदानात अंपायरचा मृत्यू, क्रिकेट विश्वात हळहळ

नेमकं काय झालं?

झीशान अन्सारीच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर जोरदार शॉट मारला पण पॅट कमिन्सने त्याची कॅच घेतली. आउट झाल्याने रायान मैदानाबाहेर डनआउटपर्यंत पोहोचला. पण त्याच दरम्यान फोर्थ अंपायरने नो-बॉलची घोषणा केली. जेव्हा रायान आउट झाला, तेव्हा हैदराबादचा विकेटकिपर हेनरिक क्लासेनचे ग्लोव्हस स्टंपसमोर असल्याने नो-बॉल देण्यात आला. अंपायर्सनी नो-बॉलची घोषणा करण्याआधी रायान मैदानाच्या बाहेर गेला होता. चौथ्या क्रमावर खेळणारा सूर्यकुमार यादव मैदानावर पोहोचला होता. पण आउट न झाल्याने रायानला फलंदाजी करण्यासाठी पुन्हा बोलवण्यात आले. पण लगेच पुढच्या ओव्हरमध्ये हर्षल पटेलने रायानला बाद केले.

MI VS SRH IPL 2025
Travis Head MI VS SRH : ट्रेव्हिस हेड सलग दोन चेंडूवर दोनदा OUT, तरीही मैदानातून बाहेर नाही; कारण...

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा.

सनरायजर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, झीशान अन्सारी.

MI VS SRH IPL 2025
Ishan Kishan MI VS SRH : इशान किशनने बांधिलकी जपली अन् हैदराबादच्या चाहत्यांची 300 धावांची आशा धुळीस मिळवली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com