Mi vs RCB toss prediction Mumbai Indians vs royal challengers Bangalore toss prediction news in marathi  twitter
Sports

MI vs RCB, Toss Prediction: टॉस ठरणार बॉस! RCB ला हरवण्यासाठी मुंबईने टॉस जिंकून काय करावं?

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २५ वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे.

Ankush Dhavre

MI vs RCB,Toss Prediction And Record:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २५ वा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे. गेल्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतकी खेळी साकारली.

मात्र तरीदेखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तर सुरुवातीचे ३ सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने दिल्लीला हरवत विजयाचं खातं उघडलं आहे. दरम्यान वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी कोणाला देणार साथ? जाणून घ्या.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणारा हा हाय व्होल्टेज सामना ११ एप्रिल रोजी रंगणार आहे. वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं, तर ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. या मैदानावर धावांचा पाऊस पाडला जातो. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात देखील मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २३४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीने २०५ धावांपर्यंत मजल मारली होती. शेवटी दिल्लीचा संघ विजयापासून २९ धावा दूर राहिला.

काय सांगते आकडेवारी?

वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत १११ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५१ सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ६० सामने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी घ्यावी.(Cricket news in marathi)

दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघ गुणतालिकेत पुढे जाण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने ४ पैकी ३ सामने गमावले आहेत. तर केवळ १ सामना जिंकला आहे. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ५ पैकी केवळ १ सामना जिंकता आला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT