Latest wtc points table update after new zealand vs australia test series cricket news in marathi
Latest wtc points table update after new zealand vs australia test series cricket news in marathi  Saam tv news
क्रीडा | IPL

WTC Points Table: WTC च्या गुणतालिकेत मोठा उलटफेर! टीम इंडिया अन् या संघात होणार फायनल?

Ankush Dhavre

World Test Championship Final Prediction:

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला आहे. यासह मालिकेवर २-० ने कब्जा केला आहे. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा मोठा फायदा झाला आहे. तर न्यूझीलंडचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

नुकताच भारतीय संघाने इंग्लंडला ४-१ ने धुळ चारली आहे. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. भारतीय संघाच्या विजयाची सरासरी ६८.५१ टक्के इतकी आहे.

तर न्यूझीलंडला २-० ने धूळ चारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ६२.५० टक्के विजयाच्या सरासरीसह दुसरं स्थान गाठलं आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ५९.०९ इतकी होती. तर न्यूझीलंडच्या विजयाची सरासरी ६० टक्के इतकी होती. मात्र या पराभवानंतर न्यूझीलंडचं मोठं नुकसान झालं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंडच्या विजयाची सरासरी ६० वरुन ५० टक्क्यांवर घसरली आहे. तर ५० टक्के विजयाच्या सरासरीसह बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानी आहे. ३६.६६ टक्के विजयाच्या सरासरीसह पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. तर वेस्टइंडिजचा संघ सहाव्या स्थानी आहे. वेस्टइंडिज संघाच्या विजयाची सरासरी २५ टक्के इतकी आहे. (Cricket news in marathi)

दक्षिण आफ्रिकेचा संघ २५ टक्के विजयाच्या सरासरीसह सातव्या स्थानी आहे. १७.५० टक्के विजयाच्या सरासरीसह इंग्लंडचा संघ आठव्या स्थानी आहे. तर एकही सामना जिंकू न शकलेा श्रीलंकेचा संघ या यादीत शेवटी आहे.

भारतीय संघाला तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याची संधी..

भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. यापूर्वी २०१९-२१ मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने फायनल गाठली होती. शेवटी न्यूझीलंडकडून भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर २०२१-२३ मध्ये झालेल्या स्पर्धेतही भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र या सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT