Shruti Vilas Kadam
मैदा, बटर, साखर (पांढरी व ब्राऊन), चॉकलेट चिप्स, अंडे, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स घ्या.
मऊ बटरमध्ये साखर घालून हलके व फुलसर होईपर्यंत चांगले फेटा.
फेटलेल्या मिश्रणात अंडे आणि व्हॅनिला इसेन्स घालून पुन्हा मिसळा.
मैदा आणि बेकिंग सोडा चाळून मिश्रणात हळूहळू घाला.
मिश्रणात चॉकलेट चिप्स घालून चमच्याने हलक्या हाताने मिसळा.
बेकिंग ट्रेवर बटर पेपर लावून छोटे गोळे ठेवून थोडे सपाट करा.
१८०°C तापमानावर १२–१५ मिनिटे बेक करा. थंड झाल्यावर कुरकुरीत चॉकलेट चिप कुकीज तयार.