Maharashtra Live News Update: कराडजवळील उंब्रज येथील गणेश धाब्याजवळ माल वाहतूक ट्रक पेटला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६, सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, केंद्राचा अर्थसंकल्प, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

कराडजवळील उंब्रज येथील गणेश धाब्याजवळ माल वाहतूक ट्रक पेटला

शिवडे गावच्या हद्दीत येथे सकाळी सहाच्या सुमारास मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग

आगीत कोणतीही जीवात नाही

उंब्रज पोलीस स्टेशन आणि अग्निशामक दलाच्या मदतीने विजवली आग

ट्रकमध्ये होता कापड माल, लाखो रुपयांचे नुकसान

शहरातील देवगिरी महाविद्यालयात सर्वपक्षीय शोकसभा.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील देवगिरी महाविद्यालयात आयोजित या सर्वपक्षीय शोकसभेला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार अब्दुल सत्तार, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय केणेकर,माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.

अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्वं

बीडच्या काकडहिरा गावातील दूध उत्पादक शेतकरी विश्वनाथ बागलाने यांचा दूध विक्री करू परत येताना एस टी ने धडक दिल्याने अपघातात मृत्यू झाला.घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. या कुटुंबातील 3 मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेत शिंदे शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. शिंदे शिवसेनाचे नेते गणेश उगले यांनी ही आर्थिक मदत पीडित कुटुंबाला सुपूर्द केली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, तसेच एसटी महामंडळाकडून एका पाल्याला सरकारी नोकरीत घ्यावी अशी मागणी गणेश उगले यांनी केली आहे..

नवी मुंबईमध्ये महापे लीलाधर नाईक कंपाउंड येथे भीषण आग

शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

लाकडाची वखार आणि पुट्टा गोदामला भीषण आग

Midc नेरुळ tbi नवी मुंबई महानगर पालिका अग्निशम दल घटनासतली दाखल

अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल

तर सध्या आग नियंत्रणात आली आहे

पेट्रोल भरण्याच्या कारणावरून कामगाराला मारहाण, सीसीटीव्ही मध्ये कैद

हिंगोली मध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरून कर्मचाऱ्याला दोन ते तीन जणांनी मारहाण केली आहे वसमत तालुक्यातील शिरडशहापूर परिसरातील वैजनाथ पेट्रोल पंपावर हा सगळा मारहाणीचा गंभीर प्रकार घडला आहे, मारहाणीची ही घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, सचिन कांबळे असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव असून याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिसात मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

माघ पौर्णिमा निमित्ताने पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा मंदिरात भाविकांची मांदियाळी

आज माघ पोर्णिमा निमित्ताने पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथे कुलदैवताला भंडाराची उधळण करण्यासाठी राज्यभरातुन भाविक खंडोबा मंदीरात पहाटेपासुन दाखल झाले,सर्वत्र यलकोट यलकोट जय मल्हार असा जल्लोष चिमुकल्यांसह नागरिकांमध्ये पहायला मिळत होता सकाळी खंडोबाला मानाची शिवती चा नैवद्य , मानाच्या काठ्यांची मिरवणूक , खंडोबा देवाचे लग्न, पालखी सोहळा अशा विविध विधिवत कार्यक्रम पार पाडण्यात आले

अमरावतीत पाच किलो एमडी ड्रग्ज जप्त

अमरावतीत पाच किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.

नागपूरच्या डीआरआई (महसूल गुप्तचर संचलनालय) पथकाची मोठी कारवाई...

गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या नवसारी परिसरातील जीएसटी भवन भागातील फ्लॅटमध्ये ही कारवाई करण्यात आली..

जप्त केलेल्या एम डी ड्रग्स ची किंमत अंदाजे पाच ते दहा कोटी रुपये असल्याची माहिती..

आमदार उत्तम जानकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पोलिसांत तक्रार अर्ज

माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारी अर्ज महावितरणचे लेखापाल दत्तात्रय रूपनर यांनी नातेपुते पोलिसात दिला

आमदार जानकर यांनी मोबाईल वरून तू महावितरण मध्ये काम करतो का, कमळाचा प्रचार करतो का, असे दरडावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारी अर्जात उल्लेख

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतील सहभागातून शिवीगाळ झाल्याचं उल्लेख

Sunetra pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सहयोग सोसायटीतून काटेवाडीकडे निघाल्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सहयोग सोसायटीतून काटेवाडीकडे निघाल्या आहेत.

Ajit pawar case : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे - रुपाली पाटील

Rohit shetty : रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण : एका हल्लेखोराकडून दुचाकीचा वापर

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरण

गोळीबारावेळी वापरलेली दुचाकी पुण्यातली

अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने मुंबईत पाठवली होती दुचाकी

गोळीबार केलेल्या हल्लेखोराने केला होता या दुचाकीचा वापर

पुण्यातून ताब्यात घेतलेल्या अमान मरोटे च्या नावाने दुचाकी ची नोंद

ताब्यात घेतलेल्या इतर ३ जणांना विकल्या गेली होती ही दुचाकी

bacchu kadu : बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला वाटा जास्त - बच्चू कडू 

आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला वाटा जास्त आहे...

महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिल्लीत भांडले पाहिजे...

बजेटचा आकडा फुगत असला तरी शेतकऱ्यांसाठी मात्र बजेट लहान होत आहे...

बजेटमध्ये फक्त योजना दिल्या रोजगाराची भाषा कोणी बोलत नाही..

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कुठलाही प्रभाव केंद्रावर दिसत नाही

parbhani : परभणीत चोरट्यांवर पोलिसांची मोठी कारवाई 

परभणी जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांना आळा घालण्यात पोलिसांना मोठे यश

परभणी शहरातील नानलपेठ पोलिस ठाणे आणि पालम पोलीस ठाण्याची मोठी कारवाईत

मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेल बंद करत चोरीच्या 20 मोटारसायकल केल्या जप्त

Parbhani : परभणीत अजित पवरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

Summary

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर परभणी शहरात सर्वपक्षीय वतीने शोक सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

Mumbai: रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर

मुंबई -

रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर

सीसीटीव्ही मध्ये एक तरुण घरासमोर असणाऱ्या चौकातून इमारतीवर गोळीबार करताना स्पष्ट दिसून येते

गोळीबार करून तरुण दुचाकी वरून फरार झाल्याचेही दिसून येत आहेत

Amravati: केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद - यशोमती ठाकूर

अमरावती -

केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद

केंद्र सरकारच्या बजेटवर काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया

बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी मध्यमवर्गीयांसाठी काहीच तरतूद नाही

वाढलेली महागाई कशी कमी करावी यावर लक्षच नाही

माजी विद्यार्थिनींचा गौरव, ट्रॉम्बे केंद्रात कार्यक्रम; १२० विद्यार्थ्यांनी सांगितली प्रेरणादायी कहाणी

मुंबईतील सामाजिक क्षेत्रात शिक्षण, रोजगार आणि सक्षमीकरणासाठी अथक कार्य करणाऱ्या DBM इंडिया या संस्थेने आपला १८वा फाउंडेशन डे एका वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. या वेळी संस्थेने माजी विद्यार्थिनींना बोलावून त्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी ट्रॉम्बे येथील DBM केंद्रात विशेष कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात १२० माजी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला, त्यापैकी प्रमुख प्रमाणात १०० हून अधिक मुली होत्या.

Amol Mitrkari: सुनेत्रा वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील - अमोल मिटकरी

- राष्ट्रवादी विलनीकरणाचा संदर्भात जास्त माहिती नाहीये.

- पण बैठकीचा विडिओ समोर आला होता त्यात अजित' दादा देखील होते.

- राष्ट्रवादी विलनीकरणा संदर्भात आपण भूमिका मांडण्या योग्य नाहीये, 'मी' खूप लहान कार्यकर्ता आहे..

- राष्ट्रवादी विलनीकरणा संदर्भात अंतिम निर्णय सुनेत्रा वाहिनी पवार घेतील.. ते सध्या गटनेत्या झाल्या.. लवकरच सुनेत्रा वाहिनी राष्ट्रीय अध्यक्ष होतील.. अमोल मिटकरींचं सूचक व्यक्तव्य..

राष्ट्रवादी शरद पवार गटासह सर्व पक्षीयांची अजितदादांना श्रध्दांजली शोक सभा

नाशिकच्या येवला शहरात आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिवंगत अजितदांदाना श्रध्दांजली व शोक सभेच्या सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते.या शोक सभा व श्रध्दांजली सभेला सर्वच पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जेष्ठ नेते माणीकराव शिंदे यांनी श्रध्दांजलीपर सभेत येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव मांडला आणि त्याला सर्वांनी हात उंचाऊन समर्थन देण्यात आले.

राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकीकडे देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांच्या अपघाताबद्दल पहिल्यांदाचं मत व्यक्त केलं आहे. या अपघाताबद्दल काही जण संभ्रम निर्माण करत असून मला राजकारण करायचे नाही असे त्यांनी म्हटले. शिवाय राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

जेजुरी येथे भंडारा विक्रेत्या दुकानदार आणि भाविक यांच्यामध्ये तुफान हाणामारी

अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत भंडारा विक्रेत्या दुकानदार आणि भाविक यांच्यामध्ये काठ्यांनी हाणामारी झाल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

बिबट्याचा मानवी वस्तीजवळ वावर वाढला.

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील जांभोरा ते पालोरा मार्गावर एका बिबट्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला. रस्त्यानं जाणाऱ्या एका सतर्क प्रवाशानं आपल्या मोबाईल कॅमेरात या बिबट्याचा व्हिडिओ कैद केला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माजलगाव तालुक्यात दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

बीडच्या माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या तालखेड फाटा येथून सराफा व्यापारी जात असताना दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत 60 लाख रुपयांचे सोने आणि चांदी घेऊन पसार झाले. याप्रकरणी माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवत 6 दिवसात चार दरोडेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिकचा तपास केला जात आहे.

हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीमध्ये मोठी वाढ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट

हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीमध्ये मोठी होईल

गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावर महसूल-पोलीस प्रशासनाची कारवाई

नांदेडच्या मुदखेडमध्ये गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपशाविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने आज पहाटे कडक आणि धडाकेबाज कारवाई केली. वासरी, शंखतिर्थ आणि टाकळी परिसरात राबवलेल्या या मोहिमेत जिलेटीनचा वापर करून अवैध वाळू उपसा करणाऱ्या तब्बल 7 बोटी नष्ट करण्यात आल्या. या कारवाईत अंदाजे 95 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल खाक झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या ठोस कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते निलेश निकम सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

पुणे महापालिकेचे नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते निलेश निकम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्यातील जिजाई निवासस्थानी दाखल

उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार पुण्यात

पुण्यातल्या शिवाजीनगर येथील जिजाई निवासस्थानी दाखल

दुपारी दीड वाजता बारामतीला जाणार..

पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदिरात चक्रीभजन

माघ यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रूक्मिणी मंदीरात चक्रीभजन पार पडले.

औसे मठाचे मठाधिपती सद्गुरू गुरूबाबा औसेकर यांची ही परंपरा आहे.

दरवर्षी माघ यात्रेनंतर औसेकर मठाच्या वतीने मंदिरात चक्रीभजन करून विठुरायाला प्रसन्न करण्याची परंपरा आहे.

सुमारे दोनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये तलवारीच्या म्यानमध्ये ३३ ड्रग्ज पुड्या

छत्रपती संभाजीनगर शहरात अमली पदार्थ तस्करीचा धक्कादायक प्रकार

तलवारीच्या म्यानमध्ये ३३ पुड्या; त्यात २०.६९ एमडी ड्रग्ज ठेवले लपवून

भाजपचा सुपडा साफ करू - धैर्यशील मोहिते पाटील

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पुरता सुपडा साफ करू असा इशारा माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला आहे.

अकलूज येथे प्रचार सभे दरम्यान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांच्यावर निशाणा साधला.

75 वर्षात माळशिरस तालुक्यात माणस मोठी केली याबरोबरच एका रात्रीतून एकाला आमदार केलं असा टोलाही माजी आमदार राम सातपुते यांना लगावला.

भाजप नेते प्रविण दरेकर यांचा रायगडमध्ये मतदारांना अजब सल्ला

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी रायगडच्या पोलादपुर येथे प्रचारादरम्यान मतदारांना अजब सल्ला दिला आहे. विरोधकांचे पैसे घ्या, मतदान कमळ आणि घड्याळाला करा अस दरेकर म्हणाले आहेत. विरोधकांचे पैसे हारमचे आहेत, खोट्या बिलांचे आहेत अस देखील दरेकर म्हणाले आहेत. दरेकर यांच्या या विधानाने निवडणुकीत होणारा पैशाचा बाजार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत धाराशिवमध्ये दिले होते संकेत

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वेगवेगळी मतमतांतर पाहायला मिळत आहेत. पक्षविलणीकरणाची चर्चा कार्यकर्त्यांपर्यंत थेट पोहोचली नसली तरी तसेच संकेत मिळत असल्याचे पाहायला मिळते. धाराशिवमध्ये अजित पवारांचे विश्वासू असलेल्या सुरेश बिराजदार यांना स्वतः अजित पवार यांनी साहेबांच्या प्रमुख कार्यकर्त्या सोबत चर्चा करा त्यांना आपल्याला सोबत घ्यायचा आहे अशा सूचना केल्या होत्या. त्यासाठी अजित पवारांनी दोन वेळा फोन केल्याची माहिती सुरेश बिराजदार यांनी दिली. दोन्ही पक्ष एकत्र येणार का याबाबत आमच्यासारखे कार्यकर्त्यांना माहिती नाही असंही बिराजदार म्हणाले.

रायगडच्या पोलादपूरमध्ये भाजपचे शिंदे शिवसेनेला आवाहन

जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत रायगडच्या पोलादपुरमध्ये शिंदे सेना आणि भाजपमध्ये थेट लढात होताना दिसत आहे. पोलादपुर भाजप नेते प्रविण दरेकर यांचे गाव असल्याने निवडणुकीच्या या रणधुमाळीत प्रवीण दरेकर भाजप आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले आहेत. दरेकर यांनी थेट शिंदे सेनेला आवाहन दिलं आहे. प्रचार सभांना होणारी गर्दी आणि भाजपमध्ये होणारा प्रवेश यावर लक्ष केंद्रीत करीत आमच्या सर्व जागा निवडून येतील आणि आमची सत्ता प्रस्थापित होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जालन्यात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला चौघांनी केली लाथा बुक्क्यांनी मारहाण

जालन्यात बँकेची आयडी का सुरू करत नाही असं म्हणत चौघांनी बँकेच्या व्यवस्थापकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जालन्यातील शेलगाव येथील ग्रामीण बँकेमधील ही घटना असून मारहाणची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.ढालेश्वर मदनलाल बोचपे असं मारहाण झालेलं शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे. दरम्यान मारहाणी प्रकरणी चार ज्ञात आरोपीसह चार ते पाच अज्ञात आरोपीं विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बदनापूर पोलीस अधिक तपास करत आहे.

कुडाळ तालुक्यातील नेरुरमध्ये ठाकरे सेनेला धक्का;   सरपंच, उपसरपंचासह असंख्य कार्यकर्ते शिंदे सेनेत

कुडाळ तालुक्यातील ठाकरे सेनेचा बालेकिल्ला असलेल्या नेरुर गावात माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. नेरूर गावच्या सरपंच भक्ती घाडी यांच्यासह उपसरपंच व ठाकरे सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यात सिंचन प्रकल्पांवर पुरवठ्याचा ताण वाढणार

उन्हाळ्याची चाहूल लागताच अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांवरील पाण्याच्या उपलब्धतेकडे शेतकरी व प्रशासनाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सध्या जिल्ह्यातील एक मोठा, सात मध्यम आणि ४८ लघु अशा एकूण ५६ सिंचन प्रकल्पांमध्ये सुमारे ६८ टक्के जलसाठा उपलब्ध असून,ही स्थिती समाधानकारक मानली जात आहे.मात्र उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने सिंचनासाठी पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सद्यस्थितीत प्रमुख धरणांतील पाणीसाठा समाधानकारक असला,तरी शेतीसह नागरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी या प्रकल्पांवर असल्याने येत्या उन्हाळ्यात मागणी वाढणार आहे. काही मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा तुलनेने कमी असल्याने त्या भागात पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही.जलसंपदा विभागाने आगामी काळात पाण्याचा काटेकोर व नियोजनबद्ध वापर करण्याचे आवाहन केले असून, सिंचनासाठी उपलब्ध पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले आहे. अन्यथा, एप्रिल–मे महिन्यांत सिंचन प्रकल्पांवरील ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे.

आझाद मैदानावर 10 मार्च रोजी लाखो वारकऱ्यांचं आंदोलन

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ज्या डोंगरावर गाथेची रचना केली असा भामचंद्र गडाला बिल्डर आणि भू-माफीयांची नजर लागली आहे आणि त्यामुळे या डोंगराच अवैधरित्या उत्खनन सुरू आहे. संत तुकोबारायांची संतभूमी असलेला भामचंद्र गड वाचवण्यासाठी आता संतभूमी संरक्षण संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वारकऱ्यांचा मेळावा घेऊन येत्या 10 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात भामचंद्र गड व परिसरात सुरू असलेलं अवैध उत्खनन थांबवण्याच्या मागणीसाठी लाखो वारकऱ्यांना मुंबईत येण्याच आवाहन संतभूमी संरक्षण संघर्ष समितीकडून वारकऱ्यांना करण्यात येत आहे. काल बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात वारकऱ्यांच्या सभा पार पडल्या. यात 10 मार्च रोजी भामचंद्र गड ही संत तुकोबारायांची भूमी वाचवण्यासाठी या आंदोलनात मुंबई येथे येण्याचआवाहन अनेक ज्येष्ठ कीर्तनकार व महाराजांनी वारकऱ्यांना केलं. यामुळे मात्र आगामी काळात भामचंद्र गड व परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननाचा मुद्दा गाजण्याची चिन्ह आहेत.

खासदार पडोळे यांचा दणका

गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या बॉर्डरवरील टोल नाक्यावर सुरू असलेल्या अवैध वसुलीचा प्रकार खासदार पडोळे यांनी उघडकीस आणला आहे. या संदर्भात त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना भररस्त्यात जाब विचारला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून गोंदिया सीमावर्ती भागातील टोल नाक्यावर वाहनधारकांकडून, विशेषतः ट्रक आणि इतर व्यावसायिक वाहनांकडून अवैधपणे पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी खासदारांकडे येत होत्या. याची शहानिशा करण्यासाठी खासदार पडोळे यांनी प्रत्यक्ष टोल नाक्याला भेट दिली. यावेळी त्यांना अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खासदार प्रशांत पडोळे अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. त्यांनी टोल नाक्यावरील ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.गरिबांकडून आणि ड्रायव्हर्सकडून पैसे वसूल करण्याचे धाडस कुणी दिले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी खासदारांनी स्पष्ट केले की, काही स्थानिक 'धाब्यांवर' बसून वसुलीचे रॅकेट चालवले जाते. हे सर्व प्रकार तत्काळ बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. खासदारांच्या या 'ऑन द स्पॉट' कारवाईमुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.

अजित पवारांच्या सासुरवाडी तेर गटात हाय व्होल्टेज लढत, मात्र विरोधी उमेदवार देखील पाळणार दुखवटा

अजित पवारांच्या सासुरवाडी असलेल्या तेर जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज लढत होत असताना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी उमेदवार कीर्तीमाला महादेव खटावकर यांनी जाहीर सभा आणि रॅलींपासून दूर राहत साधेपणाने प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आणि सक्षणा सलगर यांच्यासोबत जोरदार सामना होत असतानाच,ठाकरे गटाकडून दुखवटा पाळण्याची भूमिका घेतली गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.या निर्णयामागचं कारण सांगताना ठाकरे गटाचे नेते महादेव खटावकर म्हणाले, “अजित दादांवर आमचा विश्वास होता. दादांनी तेरसाठी काम केलं आहे आणि पुढेही करतील, अशी आमची अपेक्षा होती.” आता या निर्णयाचा नेमका परिणाम तेर गटाच्या निवडणुकीवर काय होणार, आणि या हाय व्होल्टेज लढतीत मतदार कोणाच्या पारड्यात कौल देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आंबागड किल्ला पहाण्यासाठी आलेल्या दोन तरूणांचा कालव्यात बुडून मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील गावामधून आंबागड किल्ला पाण्यासाठी आलेल्या दोन तरूणांचा आंबागड गावानजीकच्या बावनथडी डावा कालवा क्रमांक एकच्या नहरात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. जागेश्वर यशवंत वाढिवे (वय २९) व दीपक अरविंद वाढिवे (वय २६) अशी मृतांची नावे असून हे दोघेही रामपुरी (ता. लाखनी) येथील रहिवासी आहेत.माहितीनुसार, जागेश्वर व दीपक हे दोन्ही तरूण एकाच गावचे असून नात्यांमध्ये आहेत. आपल्या दुचाकीने आंबागड किल्ला बघण्याकरिता आले होते. किल्ला बघितल्यानंतर बाजूने जात असलेल्या बावनथडी कालव्याच्या प्रवाहात पोहण्याची इच्छा झाल्याने ते कालव्यात पोहण्यासाठी उतरले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.

लोणार सरोवराच्या अस्तित्वासाठी शहर कडकडीत बंद; तात्काळ निर्णयाची मागणी”

लोणार सरोवरातील वाढत्या पाणीपातळीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी लोणार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. गेल्या सहा महिन्यांपासून सरोवराची पाणीपातळी २० ते २५ फूटांनी वाढल्याने पाण्याची क्षारता व pH स्तरात मोठा बदल झाला असून दुर्मिळ जैवविविधता धोक्यात आली आहे. पाणी गोड होत चालल्याने मासे निर्माण झाले असून भविष्यात सरोवराचे मूळ स्वरूप नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे...पाणी वाढल्यामुळे आई कमलजा माता मंदिर, गैबनशहा वली दर्गा व इतर प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली असून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. शहराचे सांडपाणी व गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक गोड्या पाण्याचे स्रोत अडवून शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरणे, कायमस्वरूपी STP प्रकल्प राबवणे व सरोवर संवर्धनासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलनाचा पहिला पवित्रा म्हणून संपूर्ण लोणार शहर बंद ठेवण्यात आले आहे.

दोन हजारात जन्म प्रमाणपत्राचे पीडीएफ,बिहार येथील दोन हॅकर, प्रत्येक जन्म नोंदीची होणार चौकशी

राज्यात खळबळ उडविणारा बनावट जन्म नोंदीचा गुन्हा यवतमाळ शहरात दाखल झाला.यानंतर थेट अप्पर पोलीस महासंचालक सायबर यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली विशेष तपास समिती तयार केली.गुन्ह्यातील 13 आरोपींचा शोध घेऊन त्यांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली.यामध्ये सीआरएस पोर्टल हॅक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा समावेश असून दोन हजार रुपये घेऊन बनावट जन्म प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात दिले जात होते,असे प्रमाणपत्र घेणाऱ्या तिघांना मुंबई, ठाणे इथून अटक केलीये. हॅकरने मोठे नेटवर्क तयार करून व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हे नेक्सस सुरू केल्याचे तपासातून पुढे आले आहे

समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरीचा पर्दाफाश...तीन आरोपी अटकेत

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाढत असलेल्या डिझेल चोरीच्या घटनामुळे वाहनमालक व चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्या पार्श्वभूमीवर वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत डिझेल चोरीतील तीन आरोपींना अटक केली. तीनही आरोपी जालना जिल्ह्यातील असून आरोपींकडून 12 हजार रुपये रोख व चारचाकी वाहन जप्त केले.

कारंजा शहर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणात प्रतिक प्रभाकर साळवे (वय १९, रा. दिवरा ता जाफराबाद जि जालना) व सागर रमेश हिवराळे (वय २८, रा. सिंधी, ता. जाफराबाद, जि. जालना) या आरोपींना अटक केली, तसेच मालेगाव पोलिस ठाण्यात समृद्धी महामार्गाशी संबंधित दाखल दोन प्रकरणांचा तपास करत पोलिसांनी अलीम खान मुस्ताक खान पठाण (वय २३, रा. टेंभुर्णी, ता. जाफराबाद, जि. जालना) याला अटक केली आहे.

अमरावतीमध्ये भयंकर अपघात

अमरावतीच्या वेळ वलगाव -दर्यापूर मार्गावर दोन चार चाकी वाहनांचा अपघात..

अपघातात पाच प्रवासी झाले जखमी; दोन वाहनांची आमने-सामने धडक झाल्याची घटना....

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू रात्रीची घटना।

161 जागेसाठी 14 हजार उमेदवारांनी केले अर्ज

यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने रिक्त असलेल्या 161 पदांची भरती करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.11 फेब्रुवारी पासून पद भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळे मैदानावर उमेदवार पदभरतीची रंगीत तालीम करताना दिसत आहे. पोलीस शिपायाची 150 तर बँण्डस्मनची 11 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त होताच पोलीस अधीक्षक कार्यालयाने नियोजन सुरू केले आहे.दरम्यान पद भरती केवळ 161 जागांसाठी होत असली तरी या पदासाठी तब्बल 14 हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या संशयावरून शासकीय निवासी शाळेत अमानुष मारहाण,

अहेरी तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, वांगेपल्ली येथे मोबाईल चोरीच्या संशयावरून तब्बल शंभर विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खापा-हसारा शिवारात पट्टेदार वाघिणीचे दर्शन

तुमसर तालुक्यातील खापाते हसारा या मुख्य रस्त्यालगतच्या शिवारात पट्टेदार वाघिणीने बछड्यासह दर्शन दिल्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. या बातमीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेबाबत सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो व व्हिडिओंबाबत वनविभागाने साशंकता व्यक्त केला आहे. तुमसर शहराला हा परिसर लागून असल्याने अनेक नागरिकांनी खापा-हसारा रस्त्याकडे धाव घेतल्याचे दिसून आले.हसारा-खापा रोडवर शेतशिवारात वाघ आणि त्याचा बछडा दिसल्याची चर्चा सुरू झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना आणि मजुरांना वन्यप्राणी दिसल्याने वाहतूकही ठप्प झाली होती. वाघ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या घटनास्थळाकडे धाव घेतली, ज्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. एका प्रवासी याने आपल्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ काढला असला तरी वनविभाग हा व्हिडिओ ची पुष्टी करत नसून हात काढत आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल राहंगडाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना तातडीने गस्तीसाठी पाठवण्यात आले असून, पगमार्क शोधण्याचे काम सुरू आहे, परंतु या घटनेबाबत जो फोटो प्रसारित होत आहे, त्यावरून वनविभागाने शंका उपस्थित केली आहे. फोटोत दिसणारा परिसर आणि तो प्राणी नेमका वाघच आहे का, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.

रब्बी हंगामासाठी सोनल प्रकल्पातून पाण्याचा 40 टक्के उपसा...उन्हाळ्यात पाणीटंचाई शक्यता

वाशिम जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक प्रकल्प असलेला सोनल प्रकल्पातील पाणीसाठा सध्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यंदा रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढल्यामुळे कालव्यावरून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे. या वाढलेल्या उपशाचा थेट परिणाम प्रकल्पातील साठ्यावर दिसून येत असून,आतापर्यंत सुमारे ४० टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. सोनल प्रकल्पावर परिसरातील अनेक गावे अवलंबून असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही याच प्रकल्पातून केला जातो. मात्र पाण्याची मागणी वाढत असताना साठा वेगाने कमी होत असल्याने येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने वेळेत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com