WPL 2024: नशीबच फुटकं ना राव! १ चेंडू, २ धावांची गरज अन् RCB चा पराभव; अंतिम षटकात काय घडलं?
Women's Premier League 2024, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals:
वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील १७ वा सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या रोमांचक सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. सामन्यातील शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला जिंकण्यासाठी २ धावांची गरज होती.
मात्र शेवटच्या चेंडूवर ऋचा घोष धावबाद झाली त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात सोपा विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने २० षटक अखेर १८१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ १८० धावांपर्यंत मजल मारू शकला. या शानदार विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सने या हंगामातील प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?
या सामन्यातील शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला विजयासाठी १७ धावांची गरज होती. दिल्ली कॅपिटल्सकडून जेस जोनासन गोलंदाजी करण्यासाठी आली होती. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या ऋचाने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पुढील चेंडू निर्धाव राहिला. तिसऱ्या चेंडूवर दिशा कसात धावबाद झाली.
चौथ्या चेंडूवर ऋचाने धावत २ धावा धावा पूर्ण केल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर तिने षटकार मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला विजयासाठी २ धावांची गरज होती. मात्र त्यावेळी ऋचा धावबाद झाली आणि संघाचं विजय मिळवण्याचं स्वप्नं भंगलं. (Cricket news in marathi)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीकडून फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिग्जने ३६ चेंडूत सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली.
तर कॅप्सीने ४८ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर दिल्लीने २० षटक अखेर ५ गडी बाद १८१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून ऋचा घोषने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर एलिसा पेरीने ४९ धावा केल्या. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ विजयापासून केवळ १ धाव दूर राहिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.