WPL 2024: गुजरात जायंट्सचं खातं उघडलं! RCB ला लोळवत मिळवला शानदार विजय

Royal Challengers Bangalore vs Gujarat Giants: वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
wpl 2024 gujarat giants register their first win in womens premier league after beating royal challengers bangalore
wpl 2024 gujarat giants register their first win in womens premier league after beating royal challengers bangalore twitter
Published On

WPL 2024, Royal Challengers Bangalore vs Gujarat Giants:

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला लोळवत स्पर्धेतील पहिलाच विजय संपादन केला आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयासाठी २०० धावांची गरज होती. मात्र या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला ८ गडी बाद १८० धावा करता आल्या. यासह गुजरात जायंट्स संघाने हा सामना १९ धावांनी जिंकला आहे.

या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून जॉर्जिया वेयरहमने तुफान फटकेबाजी करत २२ चेंडूत ४८ धावा चोपल्या.यादरम्यान तिने ६ चौकार आणि २ षटकार मारले. मात्र तिची ही खेळी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी नव्हती. या सामन्यातील पराभवानंतर दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे ५ सामन्यांमध्ये ८ गुण आहेत. तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे प्रत्येकी ६-६ गुण आहेत. (Cricket news in marathi)

wpl 2024 gujarat giants register their first win in womens premier league after beating royal challengers bangalore
IND vs ENG 5th Test, Toss Update: प्रतिष्ठा राखण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात! टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग ११

गुजरातचा या स्पर्धेतील पहिलाच विजय..

या सामन्यात गुजरातची कर्णधार बेथ मुनीने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गुजरातच्या फलंदाजांनी योग्य ठरवला. गुजरात जायंसट्स संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद १९९ धावा केल्या. गुजरातकडून फलंदाजी करताना कर्णधार बेथ मुनीने ५१ चेंडूत सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली.

wpl 2024 gujarat giants register their first win in womens premier league after beating royal challengers bangalore
WPL 2024: मुंबईकर शबनीम इस्माइलने घडवला इतिहास! फेकला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू -Video

यासह लॉरा वॉलवार्टने ४५ चेंडूत ७६ धावांची तुफानी खेळी केली. या दोन्ही फलंदाजांनी मिळून गुजरातचा डाव सांभाळला. दोन्ही फलंदाजांनी मिळून १३ षटकात मिळून १४० धावांची भागीदारी केली.

या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून जॉर्जिया वेयरहमने झुंजार खेळी केली. मात्र तिची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com