WPL 2024: मुंबईकर शबनीम इस्माइलने घडवला इतिहास! फेकला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू -Video

Shabnim Ismail Fastest Delivery In Women's Cricket History: या सामन्यात विजय दिल्ली कॅपिटल्सचा झाला मात्र हवा झाली ती मुंबईची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माइलची
Shabnim Ismail bowled fastest delivery in womens cricket history during mumbai indian vs delhi capitals wpl match
Shabnim Ismail bowled fastest delivery in womens cricket history during mumbai indian vs delhi capitals wpl match twitter
Published On

Shabnim Ismail Fastest Ball In Cricket:

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील १२ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने दमदार खेळ करत मुंबई इंडियन्सवर २९ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात विजय दिल्ली कॅपिटल्सचा झाला मात्र हवा झाली ती मुंबईची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माइलची. तिने महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा कारनामा केला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची गोलंदाजी सुरु असताना तिसरे षटक टाकण्यासाठी शबनीम इस्माइल गोलंदाजीला आली होती.

या षटकातील एक चेंडू तिने ताशी १३८.३ इतक्या वेगाने टाकला. तिने टाकलेल्या या भन्नाट वेगवान चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुख्य बाब म्हणजे जगातील कुठल्याच महिला गोलंदाजाला १३५ पेक्षा अधिक गतीने चेंडू टाकता आलेला नाही.

Shabnim Ismail bowled fastest delivery in womens cricket history during mumbai indian vs delhi capitals wpl match
WPL 2024: पराभवाचा वचपा काढलाच! मुंबई इंडियन्सला धूळ चारत दिल्ली कॅपिटल्सचा शानदार विजय

शबनीम इस्माइलने क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडा चेंडू तर टाकला मात्र ती या सामन्यात सर्वात महागडी गोलंदाज ठरली आहे. तिने मुंबईकडून गोलंदाजी करताना ४ षटकं टाकली. या दरम्यान तिने ४५ धावा खर्च केल्या. यादरम्यान तिला केवळ १ गडी बाद करता आला. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार मेग लेनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्जने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. (Cricket news in marathi)

दिल्लीचा शानदार विजय..

हरनमप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. दिल्ली कॅपिटल्सकडून प्रथम फलंदाजी करताना जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक ६९ धावा चोपल्या. तिने आपल्या खेळीदरम्यान ८ चौकार आणि ३ षटकार मारले. तर कर्णधार मेग लेनिंगने ५३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर दिल्लीने २० षटकअखेर १९२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला १६३ धावा करता आल्या. यासह मुंबई इंडियन्सला हा सामना २९ धावांनी गमवावा लागला आहे.

Shabnim Ismail bowled fastest delivery in womens cricket history during mumbai indian vs delhi capitals wpl match
IND vs ENG 5th Test: इंग्लंडविरुद्ध ३- १ ने आघाडीवर असूनही शेवटचा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा का? हे आहे कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com