Harmanpreet Kaur: 'IPL पेक्षा जास्त प्रतिसाद आमच्या लीगला मिळाला..' मुंबईच्या कर्णधाराने गायले WPL स्पर्धेचे गुणगान

Harmanpreet Kaur On WPL: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या स्पर्धेचे कौतुक केले आहे.
harmanpreet kaur
harmanpreet kaur saam tv
Published On

Womens Premier League 2023:

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू खेळताना दिसून येत असतात. महिला क्रिकेटपटूंनाही आतंरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसह खेळायची संधी मिळावी म्हणून WPL म्हणजेच वुमेन्स प्रिमीयर लीग स्पर्धेची सुरूवात करण्यात आली होती.

या स्पर्धेला क्रिकेटपटूंसह क्रिकेट चाहत्यांनी देखील चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान नुकताच भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या स्पर्धेचे कौतुक केले आहे.

harmanpreet kaur
IND VS WI 5th T20I: मास्टरमाईंड शेफर्ड! सूर्या अन् संजूला बाद करण्यासाठी असा रचला सापळा; सामन्यानंतर सांगितला काय होता प्लान

हरमनप्रीत कौरने एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटले की, 'WPL ही स्पर्धा आमच्यासाठी गेम चेंजर होती. आम्हाला जो प्रतिसाद मिळाला तो अविस्मरणीय होता. घरी परतल्यानंतर ते सर्वांना आवडलं होतं. तसं खरं सांगायचं झालं तर क्रिकेट चाहत्यांना IPL पेक्षा WPL मध्ये जास्त रस होता. कारण सर्वांना काहितरी नवीन पाहायला मिळत होतं.'भारतात पहिल्यांदाच मोठ्या स्तरावर महिला लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन ४ मार्च ते २६ मार्च दरम्यान करण्यात आले होते.

तसेच ती पुढे म्हणाली की, 'वुमेन्स क्रिकेट लीग स्पर्धेने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मला अशी आशा आहे की, भविष्यात आमच्यासह आणखी काही संघ जोडले जातील. आपल्या देशात प्रतिभावान खेळाडू आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी मिळायला हवी. ते खुप मेहनत घेत आहेत.' ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून ६ कोटी रूपये तर उपविजेत्या संघाला ३ कोटी रूपये रक्कम देण्यात आली होती. (Latest sports updates)

harmanpreet kaur
IND vs IRE: कर्णधार, उपकर्णधारासह संपूर्ण संघ बदलणार! आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

हरमनप्रीत कौरवर बंदी...

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर आयसीसीने बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. दरम्यान ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरने अंपायरसोबत गैरवर्तन केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयसीसीने तिच्यावर कारवाई केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com