क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल २०२५ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आमनेसामने येणार आहेत.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने गेल्या हंगामात जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. तर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. यावेळी दोन्ही संघ विजयाने सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
कोणता संघ सर्वात मजबूत आहे, याचा अंदाच दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहून लावता येतो, या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ३४ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने २० सामने जिंकले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला १४ सामने जिंकता आले आहेत.
दोन्ही संघांचा गेल्या हंगामातील रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ २ वेळेस आमनेसामने आले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये कोलकाताने बाजी मारली होती. त्यामुळे बंगळुरुचा संघ यावेळी पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेपू्र्वी दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर कोलकाता नाईट रायडर्सचं पारडं जड दिसून येत आहे. गेल्या ७ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला केवळ १ सामना जिंकता आला आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी या दोन्ही संघांचे कर्णधार बदलले आहेत. गेल्या हंगामात श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. मात्र यावेळी तो पंजाबकडून खेळताना दिसून येणार आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. तर रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.