WPL 2025: मुंबईचा 'गोल्डन' चान्स हुकला! RCB चा विजय अन् दिल्लीची फायनलमध्ये एन्ट्री

MI vs RCB, Womens Premier League: महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
WPL 2025: मुंबईचा 'गोल्डन' चान्स हुकला! RCB चा विजय अन् दिल्लीची फायनलमध्ये एन्ट्री
mumbai indianstwitter
Published On

महिला प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील अतिशय महत्वाचा सामना ११ मार्चला मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

मुंबई इंडियन्सला हा सामना जिंकून थेट गोल्डन तिकीट मिळवून फायनल गाठण्याची संधी होती. मात्र या निर्णायक सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना ११ धावांनी आपल्या नावावर केला.

WPL 2025: मुंबईचा 'गोल्डन' चान्स हुकला! RCB चा विजय अन् दिल्लीची फायनलमध्ये एन्ट्री
IND vs NZ: टीम इंडिया तर मालामाल पण न्यूझीलंडवरही पैशांचा पाऊस; पाहा दोन्ही संघांना किती मिळाली प्राईज मनी

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, मुंबई इंडियन्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईचा हा निर्णय फसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार स्मृती मंधानाने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली.

तर एलिस पेरीने नाबाद ४९ धावांची खेळी केली. यादरम्यान मुंबईच्या खेळाडूंनी काही सोपे झेल सोडले ज्याचा त्यांना शेवटी फाटका बसला. ऋचा घोषने ताबडतोड ३६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १९९ धावांपर्यंत मजल मारली.

WPL 2025: मुंबईचा 'गोल्डन' चान्स हुकला! RCB चा विजय अन् दिल्लीची फायनलमध्ये एन्ट्री
IND vs NZ: बेहेन डर गई.. रोहित शर्माची फटकेबाजी; शमा मोहमद ट्रोल; पाहा भन्नाट मीम्स

मुंबईचा संघ धावांचा पाठलाग करण्यात अपयशी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने मुंबई इंडियन्स संघासमोर विजयासाठी २०० धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईला १० च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला सुरवातीलाच मोठे धक्के बसले.

त्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी डाव सांभाळला. मुंबईकडून फलंदाजी करताना नॅट सिवर ब्रंटने एकाकी झुंज दिली. तिने ३५ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. तर सजीवन सजनाने २३ धावांची खेळी केली. हरमनप्रीत कौरला या डावात मोठी खेळी करता आली नाही. ती अवघ्या २० धावा करत माघारी परतली.

मुंबई इंडियन्सच्या पराभवासह दिल्लीचा संघ फायनलसाठी पात्र ठरला आहे. मुंबईचा सामना गुजरातविरुद्ध होणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो फायनलमध्ये दिल्लीसोबत खेळताना दिसून येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com