KKR VS PBKS Highlights X
Sports

IPL 2025 : पावसामुळे KKR आणि PBKS सामना रद्द; पॉईंटस् टेबलमध्ये मोठा बदल, मुंबईला मोठा फटका

KKR VS PBKS Highlights : ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता आणि पंजाब हे दोन संघ आमनेसामने आले. पंजाबने प्रथम फलंदाजी करत २०१ धावा केल्या. दुसरा डावात पावसाचे आगमन झाले आणि सामना रद्द करण्यात आला.

Yash Shirke

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सामन्याचा पहिला डाव पूर्ण झाला. दुसऱ्या डावात पहिली ओव्हर झाल्यानंतर लगेच पावसाने एन्ट्री मारली. ११ वाजेपर्यंत पाऊस पडत राहिल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला आहे. यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे. पंजाबने एक गुण मिळवत चौथे स्थान गाठले आहे. परिणामी मुंबईचा संघ पाचव्या स्थानावर गेला आहे.

आयपीएल २०२५ मधील ४४ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आमनेसामने आले. श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताचे खेळाडू गोलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरले. केकेआरच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना २०१ धावांवर रोखले.

सलामीसाठी आलेल्या प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी तगडी सुरुवात केली. ६९ धावा करुन प्रियांश माघारी परतला. श्रेयस अय्यरच्या साथीने प्रभसिमरनने खेळ पुढे नेला. तीन ओव्हर्सनंतर तो कॅचआउट झाला. त्याने ८३ धावा केल्या. कॅप्टन श्रेयस अय्यरने नाबाद २५ धावा, जॉस इंग्लिसने नाबाद ११ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एका फ्लॉप झाला. दुसऱ्या बाजूला वैभव अरोराने २ विकेट्स घेतल्या. तर आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीला रहमानुल्लाह गुरबाज आणि सुनील नारायण सलामीसाठी आले. पहिल्या ओव्हरनंतर लगेच पाऊस पडायला सुरुवात झाली.

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

रहमानुल्लाह गुरबाज, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, वैभव अरोरा, चेतन साकरिया, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जॉश इंग्लिस, नेहाल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, अजमतुल्लाह अमरजई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT