
IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने खराब कामगिरी केली आहे. त्यांनी एकूण ९ सामने खेळले आहेत, यातील ७ सामन्यांमध्ये सीएसकेचा पराभव झाला. फक्त २ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला. २ गुणांसह चेन्नईचा संघ पॉईंट्स टेबलवर सर्वात शेवटी म्हणजे दहाव्या स्थानी आहे. प्लेऑफच्या स्पर्धेतून सीएसकेचा संघ जवळजवळ बाहेर पडला आहे. सुरुवातीपासून धोनी संघासोबत आहे. एमएस धोनी असतानाही चेन्नईने इतकी वाईट कामगिरी केल्याने चाहते नाराज झाले आहेत. धोनीमुळे सीएसकेची अशी परिस्थिती झाली असे काहीजण म्हणत आहेत. माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
चेन्नईने मेगाऑक्शनमध्ये चांगले खेळाडू निवडले नाही. त्यांनी बऱ्याच चांगल्या खेळाडूंना जाऊ दिले. म्हणूनच सीएसकेला चांगला संघ आणि प्लेईंग ११ सेट करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यात चूक कोणाची संघ व्यवस्थापनाची की धोनीची? यावर रैनाने खुलासा केला. खेळाडू खरेदी करण्यात आणि कोअर ग्रुप तयार करण्यात मोठी भूमिका कोणाची असते? या प्रश्नाचे उत्तर देताना रैना म्हणाला, 'यासाठी धोनीला नक्कीच फोन केला जातो. पण तो या निर्णयांमध्ये फारसा सहभागी नसतो.'
'सीएसके संघाचे सीईओ काशी विश्वनाथन हे प्रामुख्याने सर्व कामे पाहतात. धोनी फक्त त्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या ४-५ खेळाडूंची नावे सांगतो. ऑक्शनच्या वेळेस एमएस धोनीला फोन यायचा, पण तो निर्णयात सहभागी नसायचा. नेहमीप्रमाणे संघ व्यवस्थापनाने कोअर ग्रुप निवडला आहे. धोनी असा लिलाव, अशी निवड करु शकत नाही', असे वक्तव्य सुरेश रैनाने केले.
'४३ व्या वयातही धोनी विकेटकिपिंग करत आहे, संघाचे नेतृत्त्व करत आहे. संपूर्ण संघाचा भार त्याच्या खांद्यावर आहे. धोनी फक्त एका ब्रँडसाठी (सीएसके) खेळत आहे, त्याच्या नावासाठी खेळत आहे. फॅन्डमसाठी खेळत आहे. तरीही तो प्रयत्न करत आहे. पण बाकीचे १० खेळाडू काय करत आहेत? १८ कोटी, १७ कोटी, १२ कोटी किंमत असणारे काय करत आहेत? अशा संघांविरुद्ध हरत आहात ज्यांच्याविरुद्ध तुम्ही कधीही हरला नाही. तीच चूक पुन्हा पुन्हा होत आहे, असे म्हणत सुरेश रैनाने संताप व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.