हिच्यासाठी तरी जिंकायला हवं होतं... CSK चा पराभव पाहून अभिनेत्री ढसाढसा रडली, Video Viral

CSK VS SRH IPL 2025 : चेपॉकच्या स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सचा दारुण पराभव केला. या पराभवामुळे चेन्नईच्या प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता आणखी कमी झाल्या आहेत.
CSK VS SRH IPL 2025
CSK VS SRH IPL 2025X
Published On

IPL 2025 : चेपॉक स्टेडियमवर काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये हैदराबादने चेन्नईचा ५ विकेट्सने पराभव केला. सीएसकेने दिलेले १५४ चे आव्हान एसआरएचने ८ चेंडू बाकी असताना गाठले. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा सनरायजर्स हैदराबादने घरच्या मैदानात चेन्नईला धोबीपछाड दिला.

कालचा (२५ एप्रिल) सामना चेन्नईसाठी खूप महत्त्वाचा होता. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर तामिळ सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार पोहोचले होते. यात थाला अजिथ कुमार, श्रुती हासन यांचा समावेश होता. सामन्यादरम्यान श्रुती हासनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये श्रुती इमोशनल झाल्याचे दिसते.

CSK VS SRH IPL 2025
RCB कडून पराभव अन् राजस्थानच्या CEO नं थेट दारुचं दुकान गाठलं, सलग ५ सामने गमावल्याचं दु:ख पचवण्यासाठी...

चेन्नई सुपर किंग्सने सामना गमावल्यानंतर श्रुती हासनला वाईट वाटले. ती इमोशनल झाली. त्यानंतर तिने स्वत:चे डोळे पुसले असे सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणत आहेत. हा सामना पाहण्यासाठी थाला अजिथ त्याच्या कुटुंबासह स्टेडियमवर पोहोचला होता. सीएसकेच्या पराभवाने त्याचेही तोंड पडले होते.

CSK VS SRH IPL 2025
दादा भडकला; दहशतवादाला थारा नाही! सौरव गांगुलीने Ind vs Pak क्रिकेट मॅचवर स्पष्ट केली भूमिका

आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने खराब कामगिरी केली आहे. चेन्नईने नऊ सामने खेळले आहेत, यातील सात सामने त्यांनी गमावले आहेत, तर दोन सामन्यांमध्ये सीएसकेला विजय मिळाला आहे. कालच्या पराभवानंतर चेन्नईची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता आणखीच कमी झाली आहे. आता पुढच्या सीझनसाठी चेन्नईने तयारी सुरु केली आहे.

CSK VS SRH IPL 2025
धोनी ६ वर बाद, तरुणी नाराज; आधी डोक्यावर मारला हात अन् जोडीदाराला.., मिस्ट्री गर्लचा Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com