दादा भडकला; दहशतवादाला थारा नाही! सौरव गांगुलीने Ind vs Pak क्रिकेट मॅचवर स्पष्ट केली भूमिका

Ind Vs Pak : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामने नको अशी मागणी सध्या जोर धरत आहे. ही मागणी आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही लावून धरली आहे.
Sourav Ganguly
Sourav Ganguly X
Published On

Pahalgam Terror Attack : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये २८ निष्पाप लोकांचा बळी गेला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेकजण जखमी झाले. या भ्याड हल्ल्यावर देशभरातून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. क्रिकेट जगतातील दिग्गजांनी दहशतवादी हल्ल्यावरुन संताप व्यक्त केला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कठोर कारवाई करावी असे आवाहन केले आहे.

सौरव गांगुलीने कोलकातामध्ये एएनआयशी संवाद साधला. तो म्हणाला, '१०० टक्के, पाकिस्तानशी क्रिकेटचे संबंध तोडायला हवेत. कठोर कारवाई आवश्यक आहे. दरवर्षी अशा गोष्टी घडतात आहेत, ही फार गंभीर बाब आहे. दहशतवाद सहन करता कामा नये.' या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेटचे सामने नको अशी मागणी देशात जोर धरत आहे, आता गांगुलीनेही ही मागणी लावून धरली आहे.

Sourav Ganguly
RCB कडून पराभव अन् राजस्थानच्या CEO नं थेट दारुचं दुकान गाठलं, सलग ५ सामने गमावल्याचं दु:ख पचवण्यासाठी...

भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये २०१२-१३ पासून द्विदेशीय क्रिकेट मालिका झालेली नाही. राजकीय घडामोडींमुळे २००८ पासून टीम इंडियाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने तेथे खेळण्यास नकार दिला होता. म्हणून ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली गेली.

Sourav Ganguly
धोनी ६ वर बाद, तरुणी नाराज; आधी डोक्यावर मारला हात अन् जोडीदाराला.., मिस्ट्री गर्लचा Video Viral

पहलगाम हल्ल्यानंतर बीसीसीआयने मृतकांना श्रद्धांजली वाहली होती. त्यांनी यापुढे कधीही पाकिस्तान विरुद्ध द्विदेशीय मालिका होणार नसल्याचे स्पष्ट केले. पण आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामने अनिवार्य असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले. पण वाढत्या दबावामुळे बीसीसीआय हे सामने होऊ नयेत यासाठी कठोर भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sourav Ganguly
CSK VS SRH : धावत आला, उडी मारली, हवेत अफलातून कॅच पकडला अन् कामिंदू मेंडिसने सामना फिरवला, Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com