Karun Nair Duck DC VS RR X
Sports

Karun Nair : पहिल्या सामन्यात हिरो, दुसऱ्या सामन्यात झिरो; एक चूक अन् करुण नायर 'डक'वर माघारी परतला

DC VS RR Karun Nair : दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यात दमदार खेळ करणारा करुण नायर आजच्या दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात शून्यावर बाद झाला. वनिंदू हसरंगा-संदीप शर्मामुळे त्याला माघारी जावे लागले.

Yash Shirke

IPL 2025 मधील 32 व्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ एकमेकांसमोर आले आहेत. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्लीचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

जॅक फ्रेझर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल सलामीसाठी मैदानात उतरले. जोफ्रा आर्चरच्या ओव्हरमध्ये जॅक फ्रेझर-मॅकगर्क कॅचआउट झाला. यशस्वी जयस्वालने त्याची कॅच पकडली. त्यानंतर करुण नायर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या करुण नायरने दमदार खेळ करुन दाखवला होता. त्याने बुमराहची धुलाई केली होती. आजच्या सामन्यातही तसाच खेळ करावा अशी करुण नायरकडून सर्वांना अपेक्षा होती. पण एका चुकीमुळे करुण नायर बाद होऊन माघारी परतला.

नेमकं काय झालं?

संदीप शर्मा तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करायला आला. तेव्हा स्ट्राईकवर अभिषेक पोरेल होता. संदीप शर्माने ओव्हरच्या पहिल्या बॉलवर अभिषेकने शॉट मारला. शॉट थर्ड फिल्डरच्या दिशेने बॉल गेला. तेथे उभा असलेल्या वनिंदू हसरंगाने बॉल घेऊन संदीप शर्माच्या दिशेने फेकला. तोपर्यंत करुण नायर क्रीज सोडून खूप पुढे गेला होता. हसरंगाने बॉल संदीपकडे थ्रो केल्याचे पाहत करुण नायर नॉन-स्ट्राईकजवळ धावला. तो पोहोचणार इतक्यात संदीपने त्याला रनआउट केले. धाव घेण्यासाठी खूप पुढे गेल्याची चूक केल्याने करुण नायर डकवर बाद झाला.

राजस्थान रॉ़यल्सची प्लेईंग ११ -

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वनिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महीश थीक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, करुण नायर, लोकेश राहुल, अक्षर पटेल, त्रिस्तान स्तब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT