Ajinkya Rahane Viral Video : 'काय फालतू बॅटिंग केली आम्ही..' रहाणे-अय्यर यांच्यातील चर्चा व्हायरल

PBKS Vs KKR Highlights : पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यात कोलकाताचा पराभव झाला. पहिल्यांदा गोलंदाजीत कमाल करणाऱ्या केकेआरच्या संघाला ११२ धावा करणे शक्य झाले नाही. हा सामना संपल्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने निराशा व्यक्त केली.
Ajinkya Rahane Viral Video
Ajinkya Rahane Viral Videox
Published On

पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या हायव्होल्टेज सामन्यामध्ये काल पंजाब किंग्सचा विजय झाला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वामध्ये कोलकाताच्या संघाला ११२ असे शक्य वाटणारे लक्ष्य गाठणे शक्य झाले नाही. केकेआरची संपूर्ण संघ ९५ धावांवर ऑलआउट झाला. सामना संपल्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये रहाणे श्रेयस अय्यरशी मराठीत संवाद साधत असल्याचे पाहायला मिळाले.

अजिंक्य रहाणे आणि अंगकृश रघुवंशी ज्या वेळेस क्रीजवर होते, तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सचा स्कोअर ६२/२ असा होता. केकेआरच्या संघाला जिंकण्यासाठी ७५ बॉल्समध्ये ५० धावा करण्याची गरज होती. युजवेंद्र चहल आठव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. त्याने रहाणेला बाद केले. पण अजिंक्य रहाणेच्या विकेटनंतर कोलकाताची फलंदाजी ढेपाळली.

Ajinkya Rahane Viral Video
Zaheer Khan : झहीर खानच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; बाळाचं नाव ठेवलंय अगदी युनिक!

सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. तेव्हा कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरजवळ गेला आणि मराठीत काहीतरी म्हणाला. तेव्हा 'काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही.' असे रहाणे म्हणाल्याचे स्टेडियममधील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले. अजिंक्य रहाणेच्या या व्हिडीओविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

Ajinkya Rahane Viral Video
DC VS MI : तिकीट का पैसा वसूल! चालू सामन्यात चाहत्यांमध्ये तुफान राडा, एकटी महिला अख्ख्यांना पुरून उरली

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातील पराभवाची संपूर्ण जबाबदारी अजिंक्य रहाणेने घेतली. तो म्हणाला, पराभवाची जबाबदारी मी घेतो. चुकीचा शॉट मारला, मी चुकलो. मला कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. आम्ही खराब फलंदाजी केली. विकेट सोपी नव्हती तरीही १११ धावा करणे शक्य होते. गोलंदाजांनी चांगला खेळ केला. पण आम्ही काही प्रमाणात बेजबाबदारपणा दाखवला. माझ्या डोक्यात अनेक गोष्टी सुरु होत्या. मी सध्या फार निराश आहे.

Ajinkya Rahane Viral Video
DC VS MI IPL 2025 : रोहितलाच क्रेडिट का? हरलो असतो तर शिव्या मात्र एकट्या हार्दिकला दिल्या असत्या! - संजय मांजरेकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com