
IPL 2025 मध्ये अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळत आहेत. अशातच फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची बॅट तपासल्या जात असल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. राजस्थान विरुद्ध बंगळुरू या सामन्यात शिमरॉन हेटमायर आणि फिल सॉल्ट यांच्या बॅट्स अंपायर्सनी तपासल्या. कालच्या पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्यामध्ये सुनील नारायण आणि ॲनरिक नॉर्किया यांची बॅट तपासण्यात आली. तपासात यांच्या बॅट नियमात बसत नसल्याचे समोर झाले. पण बॅट्स का तपासल्या जात आहेत? हा कोणता नियम आहे? जाणून घ्या...
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये बीसीसीआयचे सचिव आणि आयपीएल गव्हर्नर अरुण धुमाल यांनी बॅटशी संबंधित नियमावर भाष्य केले. २०० पेक्षा जास्त धावा होत असल्याने निष्पक्ष खेळ व्हावा यासाठी खेळाडूंना स्ट्राईक घेण्यापूर्वी बॅट गेज म्हणजेच अंपायर्सकडील उपकरणाद्वारे बॅट तपासून घ्यावी लागले. कोणालाही फायदा होत असल्याचा गैरसमज होऊ नये, खेळाची निष्पक्षता राखली जावी यासाठी बीसीसीय आणि आयपीएलद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या नियमांनुसार, बॅटची रुंदी ४.२५ इंच (१०.८ सेमी) पर्यंत असावी. खोली २.६४ इंच (६.७ सेमी) आणि कडा (edges) १.५६ इंच (४.० सेमी) यापेक्षा जास्त असू नयेत. बॅटचा हँडल एकूण लांबीच्या ५२ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. कव्हरिंग मटेरियलची जाडी ०.०४ इंच (०.१ सेमी) पर्यंत असावी. याव्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूची बॅट गेजमधून सहज जायला हवी.
अरुण धुमाल म्हणाले, 'मैदानात प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही सलामीवीरांच्या बॅट्स चौथ्या अंपायरकडून तपासल्या जातील. मैदानातील दोन अधिकारी प्रत्येक खेळाडूच्या बॅटची तपासणी करतील. सामन्याच्या आदल्या दिवशी बॅट तपासणी केली जाईल. सामन्याच्या आदल्या दिवशी बॅट्सची तपासणी केली जात असे पण काही खेळाडू सामन्यात वेगळ्याच बॅटचा वापर करत असल्याचे समोर आल्याने मैदानात बॅट-गेज वापरण्यावर भर दिला जात आहे.'
'बॅटच्या ज्या भागाला बॉल आदळतो, त्या बॅटच्या भागाचा आकार खेळाडू वाढवून घेतात. हिटिंग स्पॉटजवळ जास्त लाकूड आणि बॅटच्या हँडलजवळ कमी लाकूड असल्याने स्ट्रोकला जास्त शक्ती मिळते आणि जोरदार शॉट मारतात येतो. यामुळे कुठेतरी फलंदाजांना फायदा होतो. हे घडू नये यासाठी म्हणून नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमाचे पालन न केल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही. पण खेळाडूला बॅट बदलावी लागेल', असे अरुण धुमाल म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.