
DC Vs MI : अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करुन देण्यास रोहित पुन्हा अपयशी ठरला आहे.
मुंबई इंडियन्सच्या सामन्यात रोहित शर्मा चांगला खेळ करण्यात पुन्हा एकदा फेल झाला आहे. त्याने आजच्या दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यात १२ बॉल्समध्ये १८ धावा केल्या आहेत. चौथ्या ओव्हरमध्ये रोहितला दिल्ली कॅपिटल्सच्या विपराज निगमनने बाद केले. रोहित शर्माने आयपीएल २०२५ मध्ये एकूण ५ सामने खेळले आहेत. ०, ८, १३, १७, १८ अशा प्रकारे रोहितने पाच सामन्यामध्ये एकूण ५६ धावा केल्या आहेत. आज त्याने आयपीएल २०२५ मधील सर्वाधिक म्हणजेच १८ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माचे अनेक फॅन्स आजचा सामना पाहायला आले होते. पण या चाहत्यांना रोहित शर्माने निराश केले आहे. यातील एका पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 'माझ्या आईला वाटतंय मी अभ्यास करतो, ती मला रागावणार आहेच, पण मला शिक्षा झाली तरी त्यांमुळे वाईट वाटणार नाही असा खेळ' असे एका लहान मुलाने पोस्टरच्या माध्यमातून म्हटले आहे.
रोहित शर्मा आज लवकर बाद होऊन माघारी परतला. पण त्याने सामन्यात नवा विक्रम रचला. आयपीएलच्या इतिहासात एकाच प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध ५० षटकार मारणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू आहे. एमएस धोनीने बंगळुरूच्या विरुद्ध ४९ षटकार मारले आहेत. तर विराट कोहलीने सीएसके आणि केएल राहुलने आरसीबी विरुद्ध प्रत्येकी ४३ षटकार मारले आहेत.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -
हार्दिक पंड्या (कर्णधार) रोहित शर्मा, रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -
जेक फ्रेजर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.