Jasprit Bumrah Shubman Gill Ind Vs Eng x
Sports

Jasprit Bumrah : मोठी बातमी! जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार, शुभमन गिलनी दिली माहिती

Ind Vs Eng 2nd Test : बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. उद्या २ जुलै रोजी या सामन्याला सुरुवात होणार आहे.

Yash Shirke

India Vs England : भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. यातील पहिला सामना लीड्सवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारतावर मात केली. आता दुसऱ्या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे. सामना सुरु होण्यापूर्वी भारताच्या प्लेईंग ११ संबंधित माहिती समोर आली आहे.

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने 'जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे की नाही' याबाबत मोठी माहिती दिली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, 'बुमराह दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उपलब्ध आहे. आम्ही खेळपट्टी पाहून प्लेईंग ११ ची निवड करु. २० विकेट्स घेण्यासाठी आम्ही संघात संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहोत', असे शुभमन गिल म्हणाला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने कसोटी संघाच्या कर्णधारपदाशी संबंधित चर्चांवर भाष्य केले होते. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत फक्त २ ते ३ सामने खेळणार असल्याचे बुमराहने स्पष्ट केले होते. लीड्सच्या कसोटी सामन्यात बुमराह सहभागी झाला होता. आता तो एजबॅस्टन कसोटी खेळणार की नाही असा प्रश्न सर्वांना पडला होता.

एजबॅस्टननंतर भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. लॉर्ड्सवर गोलंदाजांना फायदा होत असल्याने हा तिसरा सामना बुमराह खेळू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. थोडक्यात एजबॅस्टन कसोटीत न खेळता लॉर्ड्स कसोटी सामन्यामध्ये जसप्रीत बुमराह खेळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण शुभमन गिलने केलेल्या वक्तव्यामुळे बुमराह दुसरा सामन्यात सहभागी होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

Government Employee Pension : सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर! आता २० वर्षाच्या सेवेवर मिळणार पेन्शन

SCROLL FOR NEXT