
India Vs England कसोटी मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. टीम इंडियाला कसोटी सामना जिंकत १-१ अशी बरोबरी करण्याची संधी आहे. पण हा सामना जिंकणे शुभमन गिल आणि भारतीय संघासाठी कठीण असणार आहे. कारण एजबॅस्टन स्टेडियमवर भारताने आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही.
एजबॅस्टन स्टेडियमवर टीम इंडियाची कामगिरी
१९६९ मध्ये भारताने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला होता, अगदी तेव्हापासून भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. मागील ५८ वर्षांपासून एजबॅस्टनच्या मैदानावर नेहमीच भारताचा पराभव होत आला आहे. भारताने ५८ वर्षांमध्ये या स्टेडियमवर एकूण ८ सामने खेळले आहेत. यातील ७ सामने भारताने गमावले, तर एक सामना अनिर्णित राहिला. ड्रॉ सामना भारताने १९८६ मध्ये खेळला होता.
२००१ नंतर एजबॅस्टन स्टेडियमवर भारताने २०११, २०१८ आणि २०२२ मध्ये कसोटी सामने खेळले आहेत. हे तिन्ही सामने भारताने गमावले आहेत. २०११ मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला २४२ धावांनी पराभव झाला होता. २०१८ मध्ये ३१ धावांनी भारतीय संघ पराभूत झाला होता. तर २०२२ मध्ये ७ विकेट्सने भारताचा पराजय झाला होता.
भारताने लीड्सचा पहिला सामना गमावला. सामन्यात दोन्ही डावात एकूण पाच शतके झाली. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. पण गोलंदाजीमध्ये बुमराहला इतर गोलंदाजांची साथ लाभली नाही. याशिवाय अनेक खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना खराब कामगिरी केली. आता भारताला सामना जिंकून मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी आहे. पण इतिहास आणि आकडेवारी पाहता, भारतासाठी सामना जिंकणे कठीण होणार असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.