Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वाल बनणार नवा कॅप्टन, लंडनमध्ये महत्त्वाची बैठक, लवकरच मोठी घोषणा होणार?

Yashasvi Jaiswal Captaincy : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका इंग्लंडमध्ये सुरु आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताचा संघ दुसरा सामना जिंकण्याच्या तयारीत आहे. या दरम्यान यशस्वी जैस्वालशी निगडीत चर्चा रंगल्या आहेत.
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal x
Published On

Ind Vs Eng : रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेपासून गिल पर्वाची सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगला खेळ करुनही भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

कसोटी मालिकेमध्ये टीकून राहण्यासाठी भारताला दुसरा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने मालिकेत इंग्लंडने आघाडी घेतली आहे. एडबस्टन कसोटी जिंकून इंग्लंडची बरोबरी करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या दरम्यान, कर्णधार बदलाचा मोठा अपडेट समोर आलाय, पण हा बदल भारतीय संघात होणार नाहीये.

Yashasvi Jaiswal
Cricket : एक-दोन नाही तर अनेक...; भारतीय खेळाडूचा पाय अजून खोलात, शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यामध्ये सलामीवीर यशस्वी जैस्वाल चमकला. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने शतकीय खेळी केली. सराव सामन्यामध्ये अपयशी ठरलेला यशस्वी जैस्वाल फॉर्ममध्ये आल्याने चाहत्यांची चिंता मिटली. आता यशस्वी जैस्वाल आणि त्याच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते असे म्हटले जात आहे.

Yashasvi Jaiswal
Kabaddi Player Death : प्रसिद्ध कबड्डीपटूचा दुदैवी मृत्यू, कुत्र्याच्या पिल्लाला वाचवणं जीवावर बेतलं

मागील काही वर्षांपासून यशस्वी जैस्वाल देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मुंबई सोडून गोव्याकडून खेळण्याच्या त्याच्या निर्णयाची जोरदार चर्चा झाली होती. कर्णधारपद मिळणार यासाठी मुंबईचा संघ यशस्वी सोडणार असल्याचे म्हटले जात होता. त्याने हा निर्णय मागे घेतला. या प्रकरणामुळे यशस्वी जैस्वाल कर्णधार होऊ इच्छितो हे स्पष्ट झाले होते. यशस्वीचे हे स्वप्न पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Yashasvi Jaiswal
Crime : महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार, अश्लील व्हिडीओ, फोटो बनवून धमकावलं; सहकारी पुरुष अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

आयपीएलच्या पुढच्या सीझनमध्ये यशस्वी जैस्वालकडे राजस्थानच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात येईल अशी चर्चा सुरु आहे. राजस्थान रॉयल्सचा सध्याचा कर्णधार संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबतचे संकेतही संजूने दिले आहेत. यामुळे कर्णधार म्हणून यशस्वीचा विचार होत आहे. याबाबत फँचायझीकडून अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.

Yashasvi Jaiswal
Maharashtra Politics : भास्कर जाधव विरोधी पक्षनेते होण्याआधीच भाजपमध्ये जाणार? संजय राऊत म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com